शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

भाजीविक्रेत्याची मुलगी बनली ‘सुपर गर्ल’ : खेलो इंडियात सुवर्णपदक -चमकते तारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:40 PM

जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या तरी मनात ध्येय आणि जिद्द बाळगणाऱ्यांना निश्चित यश मिळते. अशीच किमया साताºयातील वेटलिफ्टर वैष्णवी पवार हिने करून दाखवली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत

ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैष्णवी पवारची चमकदार कामगिरी

स्वप्नील शिंदे।सातारा : जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या तरी मनात ध्येय आणि जिद्द बाळगणाऱ्यांना निश्चित यश मिळते. अशीच किमया साताºयातील वेटलिफ्टर वैष्णवी पवार हिने करून दाखवली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भाजीविक्रेत्याची मुलगी खºया अर्थाने ‘सुपर गर्ल’ बनली आहे.

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षीय ८१ किलो वजनी गटात वैष्णवीने चमकदार कामगिरी केली. तिने मिळवलेले यश हे सहज वाटत असले तरी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास साधा सरळ नव्हता. त्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

वैष्णवीचे वडील साताºयात भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नावर घरचा उदरनिर्वाह चालवितानाही मुलीच्या वाट्याला हलाखीचे जीवन येऊ नये, यासाठी आई-वडिलांनी धडपड सुरू केली. त्यांनी आपली मुलगी वैष्णवीला अनंत इंग्लिश मीडियम स्कूल घातले. शाळेत शिक्षक असताना ती विविध स्पर्धेत सहभागी होत होती. तिची खेळातील चुणूक पाहून क्रीडा शिक्षक जितेंद्र देवकर यांनी तिला वेटलिफ्टिंगमध्ये खेळणार का, असा प्रश्न विचारला. सुरुवातीला काय करावे, हे समजत नव्हते. तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. क्रीडा शिक्षकांनी आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले.

वैष्णवी इयत्ता पाचवीत असताना वेटलिफ्टिंग खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने बाजी मारली. हळूहळू ती एक-एक स्पर्धा जिंकत राष्ट्रीय स्पर्धेत मजल मारली. खेळामध्ये यश मिळत असताना वैष्णवीसाठी आहार आणि इतर खर्च जास्त असल्याने आई-वडिलांनी तिच्या गरजा मर्यादित करून तिच्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. तिनेही त्याची जाणीव ठेवत खेळात १०० टक्के यश मिळवण्याचा निर्धार केला.दोन महिन्यांपूर्वी आसाम, गुहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत तिने सुवर्णपदकाची कमाई केली. त्यातून तिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली. 

सुरुवातीला वैष्णवी पवार व मयुरी देवरे या दोन्ही खेळाडूंचे पालक मुलींना वेटलिफ्टिंग खेळण्यासाठी पाठविण्यास तयार नव्हते. त्यांना खेळाबद्दल सांगून त्यांचे मत परिवर्तन केले. त्यानंतर त्या दोघींकडून पहिल्या दिवसापासून सातत्याने मेहनत करून घेतली. त्यांना पहिल्यापासून मैदानात रडायचे नाही, लढायचे, हाच मंत्र देत आल्याने त्यांनी त्याचे सार्थक केले.-जितेंद्र देवकर, क्रीडा प्रशिक्षक