शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भेकवलीत शेकडो वृक्षांची कत्तल...

By admin | Updated: January 25, 2015 00:40 IST

कारवाईची प्रक्रिया सुरू : कोल्हापुरातील उद्योगपतीच्या मिळकतीकडे वन, महसूल, पोलीस खात्याची धाव

महाबळेश्वर : गडहिंग्लजचे उद्योगपती संग्राम अप्पासाहेब नलावडे यांच्या भेकवली, ता. महाबळेश्वर येथील मिळकतीमधील शेकडो वृक्षांची कत्तल विनापरवाना केल्याचे कळताच वन, महसूल आणि पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. शनिवार रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू होती. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटरवर भेकवली गाव आहे. तेथील डोंगर उतारावर गडहिंग्लज येथील उद्योगपती संग्राम नलावडे यांची सहा एकर व आठ गुंठे अशी मिळकत आहे. ही मिळकत डोंगर उतारावर असली तरी खाली मोठी दरी आहे. त्याचबरोबर समोर हिरवागार डोंगर आणि डाव्या बाजूला लिंगमळा वॉटर फॉल असे विहंगम दृश्य या मिळकतीमधून नजरेस पडते. स्थानिक दलालाने सुमारे २५ कामगारांच्या मदतीने गेले दोन दिवस या मिळकतीमधील वृक्षतोड सुरू केली. कुऱ्हाडी, कोयती घेतलेल्या कामगारांनी दोन दिवसांत मिळकतीमधील शेकडो वृक्षांची कत्तल केली. यामध्ये जांभळ, गेळा, हिरडा, भौमा अंजन, तांबट पिसा आदी वनौषधी वृक्षांचा समावेश आहे. दरम्यान, या मिळकतीला लागूनच भेकवली गावाची पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे. या टाकीतून पाणी सोडण्यासाठी आलेल्या धनंजय केळगणे व शिवाजी केळगणे यांना हा प्रकार समजला. त्यांनी हा प्रकार सरपंच सीताराम केळगणे यांना सांगितला. त्यांनी ही वृक्षतोड थांबविली. तसेच याबाबत त्यांनी वन, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच तहसीलदार अतुल म्हेत्रे हे भेकवलीतील घटनास्थळी आले. वृक्षतोडीची पाहणी केली. वृक्षतोडीच्या पंचनाम्याचे व वृक्षतोड करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. रविवारपर्यंत संबंधितांवर गुन्हा नोंद होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)