शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी दाम्पत्याची तीन चिमुरड्यांसह आत्महत्या

By admin | Updated: March 14, 2017 14:24 IST

कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्याने आपल्या तीन चिमुरड्यांसह मंगळवारी पहाटे कोयना नदीपात्रात उडी घेतली.

ऑनलाईन लोकमत

सातारा, दि. 14 -  कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्याने आपल्या तीन चिमुरड्यांसह मंगळवारी पहाटे कोयना नदीपात्रात उडी घेतली. आत्महत्या करणा-या पती या घटनेतून बचावला आहे. मात्र, पत्नीसह तीन मुले यांचा बुडून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दुपारी एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून पत्नीसह अन्य दोन मुलांचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. 
मलकापुरातील बैलबाजार रोडलगत राहणा-या अमोल भोंगाळे (वय २८) व मिनाक्षी (वय२३) या दाम्पत्याने हर्ष (साडेतीन वर्ष), श्रवण (दीड वर्ष) व चार महिन्यांच्या मुलीसह नदीपात्रात उडी घेतली होती. रविवारी पहाटे हे दाम्पत्य दुचाकीवरून कोल्हापूर नाक्यानजीकच्या नवीन कोयना पुलावर आले. 
 
पुलावरून त्यांनी आपल्या तीन चिमुरड्यांसह नदीपात्रात उडी घेतली. मात्र, काही वेळानंतर पती अमोल नदीपात्रातून सुरक्षितरीत्या बाहेर पडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. अमोलला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर बेपत्ता आई व दोन मुलांचा शोध सुरू आहे.  मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दीड वर्षाच्या श्रवणचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मिनाक्षी, हर्ष व चार महिन्यांच्या मुलीचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.