शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेला कवेत घेऊन मातेची पेटवून आत्महत्या

By admin | Updated: September 11, 2015 00:44 IST

विवाहिता मनोरुग्ण : देगाव फाट्याजवळील घटना

सातारा : पाच महिन्यांच्या मुलीला कवेत घेऊन मातेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहराजवळील देगाव फाट्यानजीक अहिरे कॉलनीत घडली. दुपारी दोन वाजता तिने वेडाच्या भरात हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. रशिदा मुन्ना खान (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, रिजवाना (वय पाच महिने) या चिमुरडीनेही या घटनेत प्राण गमावले. औद्योगिक वसाहतीजवळ देगाव फाटा येथील अहिरे कॉलनीत एका घराची खोली भाड्याने घेऊन खान कुटुंब वास्तव्यास आहे. मूळचे खटाव तालुक्यातील असलेले मुन्ना खान मजुरी करतात आणि पत्नी, मुलीसह येथे राहतात. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मुन्ना घरात नव्हते. त्यांच्या खोलीतून धूर येत असल्याचे कपडे वाळत घालणाऱ्या एका महिलेने पाहिले. या महिलेने आजूबाजूच्या लोकांना ही माहिती दिली. खोलीत पाहिले असता रशिदा यांनी पेटवून घेतल्याचे दिसून आले. नागरिकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला. मात्र, रुग्णवाहिका येईपर्यंत मायलेकींचा मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती समजताच शहर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर सायंकाळी उशिरा मायलेकींचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी प्राथमिक तपास केला. (प्रतिनिधी)