शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाच मित्रांच्या विरहाने आत्महत्या

By admin | Updated: July 29, 2016 00:27 IST

खंबाटकी घाटाजवळ विषप्राशन : आठ वर्षांपूर्वी याच ठिकाणी झाला होता अपघाती मृत्यू

शिरवळ : ‘ही दोस्ती तुटायची नाय...,’ हे चित्रपटातील गाणं नेहमीच आळवण्यात येते. आताही तसेच कारण घडले आहे. ७ ते ८ वर्षांपूर्वी आजारी मुलाला पाहण्यासाठी दवाखान्यात येत असताना झालेल्या अपघातात पाच जिवलग मित्रांचा अंत झाला होता. हा मृत्यू वारंवार मृत्यूची आठवण करून देत असल्याने चक्क सहाव्या कामगार मित्राने मित्रांच्या आठवणीत चक्क त्याच अपघातस्थळीच विषप्राशन करत आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना घडली आहे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील जुन्या टोलनाक्याजवळ असणाऱ्या वीसभिगा शिवाराजवळ. वसंत महादेव शिंदे ( वय ४६, सध्या रा. पेटकर कॉलनी, रविवार पेठ वाई. मूळ रा. कार्वे, ता. वाळवा, जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मुलाला पाहण्यासाठी जात असताना वाहन पलटी होऊन त्यांचे मित्र ठार झाले होते. याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई येथील वसंत महादेव शिंदे हे वाई येथील एका खासगी कंपनीत कामास होते. दरम्यान, वसंत शिंदे हे खंडाळा येथील वीसभिगा नावाच्या शिवारात थायमॅट हे विषारी औषध प्राशन केल्याने मृतावस्थेत आढळून आले.यावेळी वसंत शिंदे यांच्या खिशात कंपनीच्या मिळालेल्या आयकार्डवरून त्यांची ओळख पटली. याबाबत खंडाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत, हवालदार नितीन नलावडे यांनी वाई पोलिस निरीक्षक वेताळ यांच्याशी संपर्क साधत याबाबतची कल्पना दिली. वेताळ यांनी वाई येथील कंपनीमधील एका कामगाराबरोबर संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. यावेळी तत्काळ आत्महत्या केलेल्या वसंत शिंदे यांच्या बंधूंनी व सासऱ्यांनी धाव घेत याबाबतची माहिती खंडाळा पोलिसांना देताच हृदयद्रावक घटना उघडकीस आली. खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची नोंद आकस्मित मयत खंडाळा पोलिस स्टेशनला झाली आहे. हवालदार नितीन नलावडे हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) शिंदे यांचे घटनास्थळी वारंवार जाणे....जगात ‘मैत्री’ हे सर्वश्रेष्ठ नाते मानले जाते. मैत्रीसाठी जीव दिलाही जातो आणि जीव घेतलाही जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. पुणे याठिकाणी आपल्या जिवलग मित्राच्या आजारी मुलाला पाहण्यासाठी निघालेले इतर जिवलग पाच मित्रांचा खंबाटकी घाटाजवळ दुभाजकाला वाहन धडकून करून अंत झाला होता. याचा धसका सहावा मित्र वसंत शिंदे यांनी घेतला होता. गेली सात ते आठ वर्षे वसंत शिंदे हे संबंधित घटनास्थळी दर दोन-तीन दिवसांतून येऊन ढसाढसा रडत होते. आता या जिवलग मित्राने आत्महत्या केली.