शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीण जखमी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 19, 2015 23:51 IST

दुचाकी अपघातानंतर युवकाची नदीत उडी : कऱ्हाडातील घटना; दोघांवरही खासगी रूग्णालयात उपचार सुरू

कऱ्हाड : मैत्रिणीला सोडायला कॉलेजला जाताना महामार्गावर दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये मैत्रीण गंभीर जखमी झाली. या परिस्थितीत मैत्रीण जखमी झाल्याचे नैराश्य व नातेवाईक काय म्हणतील, या भीतीपोटी एका युवकाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. येथील सह्णाद्री रूग्णालयानजीक शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोघांवरही सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरे विभागातील एका वाडीमधील युवती उंब्रजच्या महाविद्यालयात शिक्षण घेते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली. रस्त्यावर आल्यानंतर तिला गावातीलच एक मित्र भेटला. संबंधित युवकाबरोबर ती दुचाकीवरून उंब्रजला जाण्यासाठी निघाली. दोघेही उंब्रजमध्ये पोलीस ठाण्यासमोर आले असताना दुचाकीला ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिली. त्यामुळे युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात युवती रक्तबंबाळ होऊन रस्त्यावरच पडली. तर युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती समजताच रस्त्यावरुन निघालेले पादचारी, स्थानिक ग्रामस्थ तातडीने धावून आले. त्यांनी दोन्ही जखमींना बाजूला घेऊन उटवून बसविले. मात्र, दोघांनाही गंभीर इजा झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी दोघांनाही उपचारार्थ तेथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले. मात्र, युवती गंभीर जखमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही कऱ्हाडच्या सह्णाद्री रूग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रूग्णवाहिकेतून त्यांना ‘सह्णाद्री’मध्ये आणण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात जखमी युवतीवर उपचार सुरू करण्यात आले तर युवक जखमी अवस्थेत बाहेरच थांबून होता. काही वेळानंतर संबंधित युवक रूग्णालयाच्या आवारातून बाहेर पडला. तो धावतच कोयना नदीच्या जुन्या पुलावर गेला. पुलावरून त्याने नदीपात्रात उडी घेतली. दरम्यान, जुन्या पुलानजीक काहीजण मासेमारी करीत होते. युवकाने नदीपात्रात उडी घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर मासेमारी करणाऱ्यांनीही लगेच पात्रात उडी घेऊन त्या युवकाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला सह्णाद्री रूग्णालयात आणण्यात आले. जखमी युवती व आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या युवकावर अद्यापही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात झाली आहे. (प्रतिनिधी) रक्तबंबाळ स्थितीत घेतली उडी दुचाकी अपघातात युवकही जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेतून रक्तही वाहत होते. अशा परिस्थितीतच तो युवक पुलाच्या दिशेने धावला. नागरिकांना काही समजण्यापूर्वीच त्याने पुलावरून खाली उडी घेतली. हा सर्व प्रकार काही नागरीकांनी प्रत्यक्ष पाहिला. मात्र, नेमका काय प्रकार आहे, हे कोणालाही उशिरापर्यंत समजले नाही. ओळखपत्रावरून पटली ओळख युवती जखमी व युवक बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे दोघांचीही ओळख पटविण्यात सुरूवातीला अडचणी आल्या. मात्र, युवतीकडे तिच्या महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडल्याने त्यांची ओळख पटली. पोलिसांनी घटनेची माहिती घरी कळविल्यानंतर त्या युवतीचे नातेवाईक रूग्णालयात आले. मित्र पोहोचला रूग्णालयात आत्महत्येच्या प्रयत्नानंतर युवकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मोबाईलमध्ये असलेल्या क्रमांकावरून त्याच्या मित्रालाही रूग्णालयात बोलावून घेण्यात आले. मित्र रूग्णालयात आल्यानंतर त्याने त्या युवकाला विश्वासात घेत त्याच्याकडून सर्व माहिती घेतली. तसेच घटनेची माहिती नातेवाईकांना दिली.