औंध : गोपूज-गुरसाळे रोडवरील गोपूजनजीकच्या ओढ्यात उसाचा ट्रॅक्टर रविवारी दुपारी पडला. सुदैवाने यामध्ये ट्रॅक्टरचालक बचावला आहे. यामध्ये ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अंबवडे येथून गोपूज कारखान्याकडे ऊस घेऊन येणारा ट्रॅक्टर ओढ्यानजीक आल्यानंतर उतार असल्याने ट्रॉलीला झोला बसला. त्यामुळे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने सरळ ओढ्यात गेला. यामध्ये चालक सागर सुरेश गायकवाड बचावला असून, त्याला कसलीही इजा झाली नाही. उसाचेही नुकसान झाले आहे. या रोडवरील पुलास संरक्षक कठडा नसल्याने नवीन वाहनधारकांच्या लगेच लक्षात येत नाही. यापूर्वी चार वर्षांपूर्वी ट्रॅक्टर खाली जाऊन एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संरक्षक कठडा अथवा लोखंडी बार लावण्याची गरज आहे.
फोटो : २१गोपूज ऊस
गोपूजजवळच्या ओढ्यात रविवारी उसाचा ट्रॅक्टर पडला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. (छाया : रशिद शेख)