शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बनविले ऊस पेरणी यंत्र !

By admin | Updated: April 12, 2016 00:40 IST

मेक इन सातारा : सूरज गावडे, सूरज दळवी, पंकज पाटील, प्रथमेश जगताप यांची डोक्यालिटी

सातारा : तंत्रकौशल्य व कल्पकतेच्या जोरावर गौरीशंकरच्या पदवी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक पद्धतीचे ऊस पेरणी यंत्र विकसित केले आहे़ शेती व शेतकरी घटक हा केंद्रबिंदू मानून सामान्यातील सामान्य शेतकऱ्यालाही सहजपणे हाताळता येईल असे नावीन्यपूर्ण यंत्र विकसित केल्याने वेळेची व पैशाच्या बचतीबरोबर अचूकता साधली जाणार आहे़ या ऊस पेरणी यंत्रामुळे उत्पादन क्षमतेला चालना मिळणार आहे. वजनाने हालके असल्याने छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने शेतापर्यंत हे यंत्र सहज घेऊन जाता येत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे़ विद्यार्थ्यांनी कमी खर्चात हे यंत्र विकसित केले आहे. ‘या यंत्राची उद्योगजगत व कंपन्यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात काही तांत्रिक बदल घडवून बाजारपेठेत उपलब्ध करण्याचा मानस आहे़ हे यंत्र कृषीक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवेल,’ असा विश्वास जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केला.लिंब येथील सातारा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट महाविद्यालयातील मॅकेनिकल विभागातील सूरज गावडे, सूरज दळवी, पंकज पाटील, प्रथमेश जगताप या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ऊस पेरणी यंत्र विकसित केले आहे़ त्याची यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आली आहे़ अल्प किमतीत तयार केलेल्या या यंत्रामुळे कमी वेळेत अधिक काम तसेच चार मजुरांचे असलेले काम केवळ एका मजुरामध्ये होऊ शकेल़ पारंपरिक पद्धतीने एक एकर उसाची लागवड करावयासाठी दोन दिवस लागत असतील तर हे यंत्र तेच काम केवळ चार तासांत करणार आहे़ यंत्र निर्मितीसाठी विभाग प्रमुख प्रा़ आऱ पी. कुलकर्णी, प्रा़ आऱ व्ही़ निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्रा़ मदन जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयंवतराव साळुंखे, आप्पा राजगे, डॉ़ अनिरुद्ध जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ़ आलम शेख यांनी गौरव केला. (प्रतिनिधी)