शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 30, 2015 00:10 IST

रणजित नाईक-निंबाळकर : नीरा खोऱ्यात ‘लोकनेते’कडून सर्वाधिक दर

फलटण : नीरा खोऱ्यातील साखरपट्ट्यामध्ये ऊसदराची जोरदार स्पर्धा सुरू असून लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने त्यांच्या चाचणी हंगामात गाळपास आलेल्या तालुक्यातील उसाला २२६१ रुपये दर दिला आहे. ऊसदराच्या या स्पर्धेमुळे ऊस उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. नीरा खोऱ्यात सर्वाधिक दर देणारा हा कारखाना ठरला आहे.फलटण तालुक्यात उसाचे प्रचंड उत्पादन होत असून तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांना ऊस देऊन मुबलक प्रमाणात राहणारा ऊस तालुक्याबाहेरील कारखान्यांकडे जात होता. बाहेरील कारखानदारांकडून ऊस उत्पादकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी तसेच दुष्काळी पट्ट्यातील जनतेचे जीवनमान उंचावून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी दुष्काळी व डोंगराळ उपळवे (ता. फलटण) येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची उभारणी केली. याच्या गळीत चाचणी हंगामात आलेल्या उसाला पहिला हप्ता १९०१ रुपये आपण दिला. दुसरा हप्ता ३६० रुपये असा एकूण २२६१ रुपये दर आपण तालुक्यातील ऊस उत्पादकांना देत असल्याचे कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांनी सांगितले. चालू हंगामातही आपण स्पर्धात्मक दर देणार असून कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन दि. १४ आॅक्टोबर रोजी व पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ दि. १६ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्याचवेळी कारखान्याच्या १९.५ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभही करणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ५००० मे. टन असून या हंगामात ७ ते ८ लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील ऊस उत्पादकांनी ऊसदराची चिंता करू नये, असे आवाहन रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)सर्वाधिक दराने ऊसदराची स्पर्धा नीरा खोऱ्यामध्ये माळेगाव, सोमेश्वर यासारखे मोठे कारखाने असताना आजारी श्रीराम साखर कारखान्याने सर्वाधिक २२०७ रुपये दर दिला होता. आता यात लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने २२६१ रुपये दर जाहीर केल्याने साखरपट्ट्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्सने १८०० रुपये दर दिला आहे. त्यामुळे तो आता किती दर जाहीर करतोय, तसेच श्रीराम आणखी जादा दर वाढवून देणार का, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. ऊसदराची स्पर्धा ऊस उत्पादकांना फायदेशीर ठरत आहे.इतरांपेक्षा जादा दर देणार : रणजितसिंह लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याकडे येत्या हंगामात गाळपास येणाऱ्या फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या उसाला इतर कारखान्यापेक्षा जास्त दर आपण देणार आहोत. तालुक्यातील ऊस उत्पादकांना अच्छे दिन आणण्याचा दिलेला शब्द आपण पाळत आहोत, असे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.