शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

ऊस कडू अन् आले झाले गोड...

By admin | Updated: May 29, 2015 00:06 IST

कालगाव-मसूर : ३० एकर क्षेत्रात लागवड; आंतरपिकांनाही प्राधान्य

जगन्नाथ कुंभार = मसूर  -ऊसशेतीला फाटा देत बेलवाडी-मसूर येथे शेतामध्ये आले लागण धुमधडाक्यात सुरू असून शेतकऱ्यांनी जवळपास ३० एकर क्षेत्रावर आल्याची लागण केली आहे.आले पीकाला लागण करताना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. सुरूवातीला शेतीची नांगरणी करायची नंतर ते शेत रोटॅव्हेटरने आगदी भुसभुशीत करायचे व नंतर गादी वाफे करून त्यामध्ये आल्याची लागण करावी लागत आहे. सध्या ऊस दराची परवड पाहता उसशेतीला फाटा देत नगदी उत्पन्न देणारे आले पिकाकडे शेतकरी वळले आहे. आले या पिकाबरोबरच मिरची, घेवडा , गहू ही आंतरपीके घेऊन उसापेक्षा एकरी जास्तीच उत्पन्न निघेल असे शेतकरी तानाजी संकपाळ, आप्पासो फडतरे, सागर संकपाळ, नवनाथ बोबडे, गणेश फडतरे, बबन बोबडे, प्रल्हाद फडतरे, दादासो बोबडे या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. असा येतो खर्चएक एकर आले लागण करत असताना एकराला १००० किलो बियाणे लागत आहे. त्यासाठी ५०० किलोच्या गाडीला १८००० प्रमाणे दोन गाडीचे मिळून ३६००० रूपयाचे बियाणे खरेदी करावे लागत आहे. लावणी करताना आले लागणीच्या माहितीचेच मजूर आणावे लागत आहेत. त्यांना गुंठयाला १२५ प्रमाणे एकराला ५००० हजार रूपये मजूरी द्यावी लागत आहे.अशी माहिती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ऊस शेतीतून मिळणारे उत्पन्न अगदीच नगन्य आहे. यामुळे शेतामध्ये दुसरे कोणते नगदी पीक येईल या विषयी मातीपरीक्षण केले तर आमची शेती आले पीकाला पोषक असल्याचे आढळून आल्याने आम्ही आल्याची लागण करीत आहे.- राजेंद्र जाधव, शेतकरी