शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

साखर कारखानदारीत राजकारण नको : रामराजे

By admin | Updated: October 16, 2015 22:43 IST

न्यू फलटण शुगर वर्क्स : मोळी पूजन कार्यक्रमात सर्वांचाच एकमेकांना सबुरीचा सल्ला

साखरवाडी : ‘साखर उद्योगामध्ये राजकारण आणि अर्थकारण यांचे घातक समीकरण सुरू आहे. शासन-साखर कारखान्यांचे प्रश्न समजून घेणार नसेल तर केंद्र सरकारने आमच्यावर ‘एफआरपी’ची बंधने टाकू नयेत. आमचे आम्ही ठरवू, असे सांगतानाच फलटण तालुक्यातील साखर कारखाने टिकले पाहिजेत. यासाठी साखरवाडीच्या साखर कारखान्याबाबत मी कधी राजकारण केले नाही आणि करणारही नाही,’ असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. दरम्यान, यावेळी सर्वांनीच एकमेकांना सबुरीचा सल्ला दिला.साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याच्या २०१५-१६ चा मोळी व गव्हाण पूजन कार्यक्रम रामराजे व उद्योगपती माधवराव आपटे यांच्या हस्ते झाला. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कारखान्याचे संचालक महेश साळुंखे-पाटील, स्टेट बँकेचे डेप्यूटी जनरल मॅनेजर शेटी, रविरंजन प्रसाद, दत्त इंडिया प्रा. लि. चे जितेंद्र धारुशेठ, यतीन भाई, शंकरराव माडकर, सरपंच विक्रमसिंह भोसले, डी. के. पवार, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘सरकारने साखर कारखान्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा कहरच केला आहे, तो बदलला पाहिजे. त्यांनी कारखान्याचे प्रश्न समजून घेऊन कारखाने टिकले पाहिजेत, यासाठी धोरण आखले पाहिजे. सध्या उसाला एकरकमी दराची मागणी होऊ लागली असताना बँका कारखान्यांना एकरकमी दर देत नसल्याने ते शक्य नाही. ऊसउत्पादकांना योग्य दर मिळाला पाहिजे; परंतु तो मागताना भान ठेवले पाहिजे.’यावेळी माणिक भोसले, मारुती माडकर, युनियनचे बाळासाहेब भोसले, केन सप्लायर्सचे दशरथ चोरमले, पोपट भोसले, बाळासाहेब खलाटे, श्रीहरी वाघ आदींसह शेतकरी, सप्लायर्स, कामगार उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील यांनी स्वागत केले. (वार्ताहर)दिवाळीपूर्वी ‘एफआरपी’ची रक्कम : प्रल्हादराव साळुंखे-पाटीलप्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी कारखान्याची गेल्या ८५ वर्षांतील चढ-उताराविषयी माहिती दिली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मक दर देणे क्रमप्राप्त असून, यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करून धाडसाने या हंगामात कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. ऊस उत्पादकांना ३०० रुपयांचे पेमेंट बँक खात्यावर जमा केले असून, ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास आम्ही बांधील आहोत. याबाबत शेतकऱ्यांनी निश्चित राहावे. दिवाळीपूर्वी आम्ही ‘एफआरपी’ची रक्कम देणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.