कऱ्हाड : कोळे, ता. कऱ्हाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत विंग येथे पल्स पोलिओ लसीकरणाला जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्याहस्ते प्रारंभ झाला. पोलीस पाटील रमेश खबाले, तानाजी मोहिते, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुनीता थोरात, आरोग्य उपकेंद्राच्या अधिकारी अर्चना यादव, आरोग्य सहायक पंकज नलवडे, युवराज शेवाळे, संतोष जाधव, प्रगती जाधव, विनया पाचपुते, सरिता खबाले, सुषमा कणसे, भाग्यश्री पाटील, सोनाली सोनवणे, सुजाता घोडके उपस्थित होत्या.
जिल्हा नियोजनमधून कऱ्हाडसाठी निधी द्यावा!
कऱ्हाड : पालिकेला शहरासाठी जिल्हा नियोजनमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा, यासाठी लोकशाही आघाडीच्यावतीने सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. २०२०-२१ साठी जिल्हा नियोजनमधून पालिकेला शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा. या निधीद्वारे शहरात भरीव कामे करता येतील. तसेच प्रलंबित राहिलेली कामेही करता येतील, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक मोहसीन अख्तर अंबेकरी, पल्लवी शिवाजी पवार, सुनंदा दिलीप शिंदे, माजी नगरसेवक सुहास पवार, जयंत बेडेकर, अमित शिंदे उपस्थित होते.
विंग येथे महिला मेळाव्यास प्रतिसाद
कुसूर : जिल्हा बँकेच्या विंग, ता. कऱ्हाड शाखेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित महिलांना बँकेच्यावतीने भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. शाखा व्यवस्थापक मीना करपे, रोखपाल मीनल भोसले, शाखा विस्तार अधिकारी अभिजित देशमुख, अजित पवार यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर, पाच लाखापर्यंत ठेवींना विमा सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर एक टक्का जादा व्याजदर आदी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघामार्फत ऑनलाईन मेळावा झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एस. शेख अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक व माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर तसेच महाविद्यालयातील प्रा. योगेश वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अभिजित चौरे, राहुल शेवाळे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सोनाली वाघमारे, मयुरी वीर, नेताजी पाटील, सुषमा सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप चोपडे यांनी प्रास्ताविक केले. विद्या कापसे यांनी सूत्रसंचालन केले. जमीर पटेल यांनी आभार मानले.
पोलीस उपअधीक्षकांना मनसेकडून निवेदन
कऱ्हाड : ऊर्जामंत्र्यांसह वीज कंपनीच्या संचालकांवर फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी मनसेच्यावतीने पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, वाहतूक सेनेचे सतीश यादव, झुंजार यादव, नितिन महाडिक, महिला मनसेच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी पोळ, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र कांबळे, रोहित मोरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष विनायक भोसले, अमोल हरिदास, आबा गडाळे, स्वप्नील गायकवाड, संदीप लोंढे, संभाजी सकट, प्रवीण गायकवाड उपस्थित होते.