शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी आंतरराष्ट्रीय कामगिरीची हॅट्ट्रिक !

By admin | Updated: August 4, 2016 01:29 IST

ग्रामीण विद्यार्थ्यांचे यश : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मलेशियात सुवर्णयश

भुर्इंज : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्यांदा परदेशात यशस्वी कामगिरीची हॅट्ट्रिक करण्याची किमया केली आहे. पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मलेशियात जाऊन आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत भारताचा विजयी झेंडा फडकावल्याने संपूर्ण परिसरातून या विद्यार्थ्यांवर कौतुक होत आहे. अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन, आॅस्ट्रेलिया, थायलंड, नेपाळ, तैवान, मलेशिया, भारत आदी २१ देशांमधील तब्बल १६३९ विद्यार्थी मलेशियात झालेल्या या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्ये तिरंगाचे ४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, वृषाली रवींद्र पवार ( तिसरी), गिरिराज जयवंत पवार (पाचवी), सलील समीर राजे (पाचवी) आणि तन्मय सुविचार कुंभार (आठवी) या चारही स्पर्धकांनी रौप्य पदक व ट्रॉफी पटकावले. मोठ्या संख्येने सहभागी झालेले देश आणि त्यांचे विद्यार्थी स्पर्धक, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हुशारीचा, कौशल्याचा या स्पर्धेत मोठा कस लागला. तरीही या जागतिक कामगिरीत सरस कामगिरी बजावत तिरंगाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश विशेष उल्लेखनीय व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मुख्याध्यापिका वैशाली कुंभार मलेशियाला गेल्या होत्या. यापूर्वी तिरंगा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँकॉक, थायलंड, नेपाळ या ठिकाणी यशस्वी कामगिरी बजावत आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची आता तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना सुनीता पाडळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार, प्राचार्या वनिता पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)