खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावचा तन्मय मोटे याने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक मिळवून गावचे नाव उज्ज्वल केले.
नेपाळ येथे झालेल्या इंटरनॅशनल ज्यू कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत तन्मय भाऊसो मोटे याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत रौप्यपदकाचा मान मिळवला. स्वच्छ सुंदर ग्राम स्पर्धेत दिल्लीपर्यंत गावचा डंका मिरविलेल्या धनगरवाडी गावाने या निमित्ताने आणखी एकदा उत्तुंग यश मिळविले आहे. या खेळासाठी विजय पाटील, वैभव आम्बले, सिद्धी परुटे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
त्याच्या या यशाबद्दल माजी सभापती मकरंद मोटे, सरपंच, उपसरपंच यासह ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले.
फोटो आहे