मलकापुरात ठिकठिकाणी फुटपाथवर व्यावसायिकांसह दुकानदारांच्या फलकांनी अतिक्रमण केले होते. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. गुरुवारी महामार्ग देखभाल विभागाच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक मोहीम राबवत पन्नास फलकांसह हातगाडे जप्त केले.
फोटो
-------
कोरोना लसीकरणास प्रतिसाद
रामापूर : पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. त्याला शहर आणि परिसरात नागरिकांच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४५ च्या वरील वयोगटातील आणि मेडिकल हिस्ट्री तपासून नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे.
प्रवासी शेड उभारा
रामापूर : पाटण तालुक्यातील पाटण-कुसरुंड मार्गावर प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध लोकांना उन्हात उभे राहून एसटीची वाट पहावी लागत आहे. या मार्गावर जवळपास १० बस थांबे आहेत. मात्र कोठेही प्रवासी निवारा शेड नाही. प्रवाशांकरिता निवारा शेड उभारावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.