- ज्यांच्या घरात गॅस सिलिंडर कनेक्शन आहे, त्यांना रॉकेल मिळत नाही. परंतु, आता गॅस सिलिंडरचे दर वाढत चालल्याने स्वयंपाक कशावर करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- येथून पुढे दर महिन्याच्या एक तारखेला सिलिंडर टाकीचा दर जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे बहुतांशवेळा दरवाढीची टांगती तलावर ग्राहकांवर असणार आहे.
...........................................................
व्यावसायिक सिलिंडरही महाग...
घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडर टाकीचे दर सतत वाढत चालले आहेत. व्यावसायिक टाकीच्या दरात कधीतरी कपात होते. परंतु, घरगुतीचे दर वाढतच जातात. जानेवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडर टाकीचा दर १,३४८ रुपये होता. फेब्रुवारीत १,५३९ रुपये झाला तर एप्रिल महिन्यात १,६४६ रुपयांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर किमत कमी झाली. जुलै महिन्यात १,५६२ रुपयांना सिलिंडर मिळत होता. सध्या हा दर वाढून १,७०४ रुपये झाला आहे.
................................................................
प्रतिक्रिया...
कोरोनामुळे मागील वर्षापासून महागाईचाच सामना करत आलो आहोत. कामे मिळवताना अडचणी येत आहेत. त्यातच अनेकवेळा पुरुष मंडळींनाही घरातच बसून राहावे लागते. त्यातच सिलिंडर टाकीचा दर ९०० रुपयांजवळ पोहोचलाय. यामुळे गॅस सोडून चूल पेटविण्याची वेळ आली आहे.
- कविता पवार, गृहिणी
..................................
कोरोनाच्या सव्वा वर्षाच्या काळात महागाईमुळे जगणं अवघड झालं आहे. शहरात तर गॅस पेटविण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच सिलिंडर टाकीचा दर सतत वाढत चालला आहे. शहरात फ्लॅटमध्ये राहतो. तेथे आता या सिलिंडर महागाईमुळे चूल पेटविण्याची वेळ आलेली आहे.
- स्वाती काळे, गृहिणी .
..............................................................................