शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अपघातानंतर भेदरलेल्या सहलीतील विद्यार्थ्यांना रयतसेवकांचा आधार!

By admin | Updated: January 13, 2016 01:08 IST

भुर्इंज : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाकडून चहा-नाष्टा

भुर्इंज : अजंठा वेरुळला १४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या दोन गाड्या मंगळवारी सकाळी भुर्इंज हद्दीत आली. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण... दंगा, मस्ती सुरू असतानाच अचानक गाडीला ब्रेक लागला. काय झाले पाहण्यासाठी काही शिक्षक खाली उतरले. पाहतात तर अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजले. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी चांगल्याच घाबरल्या. यांना भावनिक आधार देण्यासाठी भुर्इंज येथील रयतसेवक धावून आले.याबाबत अधिक माहिती अशी, वाळवा शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील विद्यामंदिर विद्यालयाच्या १४० विद्यार्थ्यांना घेऊन राज्य परिवहन महामंडळच्या दोन गाड्या अजंठा वेरुळकडे निघाल्या होत्या. सकाळी आठच्या सुमारास भुर्इंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयासमोर सुदाम तुकाराम वाघमारे (वय ६५, रा. पिराचीवाडी, ता. वाई) या सायकलस्वारास एका बसची ठोकर बसली. या घटनेत वाघमारे हे जागीच ठार झाले. या घटनेने दोन्ही बसमधील विद्यार्थी आणि शिक्षक चांगलेच घाबरून गेले. अपघाताची माहिती मिळताच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी धावले. अपघातग्रस्त बस पोलीस ठाण्यात नेणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांना कोठे थांबवायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. प्राचार्य पाटील यांनी तातडीने निर्णय घेत सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देत विद्यालयात आणले. रयत सेवकांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होण्यास मदत झाली. मदन भोसले यांच्या प्रयत्नातून दुसरी बस उपलब्ध झाल्यानंतर दोन्ही बसनंतर अजंठा वेरुळकडे रवाना झाल्या. दरम्यान, या मदतीबद्दल वाळवा शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले. याशिवाय सर्व विद्यार्थ्यांनीही आर. एस. पाटील यांना ‘थँक्यू सर’ म्हणतच पुढील प्रवासाला सुरुवात केली. (प्रतिनिधी)थंडीत वाफाळलेला चहाआधीच थंडीने कुडकुडणाऱ्या व अपघाताने भांबावलेल्या या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्राचार्य पाटील यांनी चहा व नाष्ट्याची सोय केली. दुसरी बस येईपर्यंत विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेण्याबाबत रयत शिक्षण संस्थेचे सदस्य भय्यासाहेब जाधवराव यांनीही शाळा व्यवस्थापनाला सूचना केल्या.