शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी कलागुणांना वाव द्यावा

By admin | Updated: September 15, 2015 23:55 IST

संजीव खडके : ‘अभिनव’चे उपक्रम कौतुकास्पद; विविध उपक्रमांनी ‘अभियंता दिन’ साजरा

शिरवळ : ‘खेड्याकडे चला ही संकल्पना महत्त्वाची आहे. याबरोबरच नवनवीन संकल्पना निर्माण करुन ज्ञान जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. यासाठी आधुनिक इंजिनिअरिंगचे जनक सर विश्वेश्वरया यांचे स्मरण विद्यार्थ्यांनी करावे. अभिनव एज्युकेशन सोसायटी राबवित असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन पुणे विभागीय सहकार आयुक्त संजीव खडके यांनी केले. वडवाडी ता. खंडाळा येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेकनॉलॉजीमध्ये राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव जगताप, उपाध्यक्ष संजीव जगताप, ‘लोकमत’चे वरिष्ठ शाखाप्रमुख संतोष भोगशेट्टी , जाहिरात विभागाचे संतोष जाधव, सचिव सुनिता जगताप, विश्वस्त नानासाहेब ताकवले, कुमोदिनी ताकवले, विजय जाधव, विजय खुटवड, प्राचार्य प्रशांत पाटील, प्रा. डी. के. खोपडे, प्रा. डॉ. योगेश मलशेट्टी आदी उपस्थित होते. यावेळी अभिनव मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संजीव खडके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजीव जगताप, प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यकत केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध उपकरणांचे मान्यवरांनी कौतुक केले. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. पायल शिंदे, प्रा. प्राजक्ता पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली मलशेट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. (प्रतिनिधी)