शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी परीक्षेला मुकले

By admin | Updated: November 30, 2015 01:18 IST

जिल्हा परिषदेचा सावळागोंधळ : परीक्षा केंद्राचे पत्ते चुकीचे

सातारा : जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेवेळी अनेक परीक्षार्थींना ‘वेळेत आला नाही’ असे कारण पुढे करून शनिवारी हाकलून देण्यात आले होते; मात्र दुसऱ्या दिवशी रविवारीही परिचर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेवेळीही परीक्षा केंद्राचे पत्ते चक्क चुकीचे छापल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, रविवार, दि. २९ रोजी दुपारी दोन वाजता परिचर या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापनाने परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा छापल्याने अनेक विद्यार्थ्यांना केंद्र सापडले नाही. प्रवेश पत्रावर भारतमाता विद्यामंदिर कोडोली सातारा-रहिमतपूर रोड हा पत्ता छापण्यात आला आहे. परंतु वास्तविक खरा पत्ता शिवराज पेट्रोलपंपाजवळ हुंडाई शोरूमच्या पाठीमागे भारत विद्यामंदिर असा होता. त्यामुळे विद्यार्थी या पत्त्यावर पोहोचले; परंतु तेथे त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. तेथील केंद्र प्रमुखांशी विद्यार्थ्यांनी चर्चा केली. ‘परीक्षेला बसू द्या,’ अशी विनंतीही केली; पंरतु त्यांना परीक्षेला बसू दिले गेले नाही. या परीक्षेसाठी नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, धुळे, कऱ्हाड, पाटण आदी जिल्ह्यांतून व शहरातून मुले-मुली परीक्षेसाठी आली होती. जिल्हा परिषदेच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे फटका बसला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आमच्या या नुकसानास जबाबदार कोण? असाही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा परीक्षा पुन्हा घ्यावी, अशीही मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)एवढ्या लांबून आम्ही सकाळीच साताऱ्यात पोहोचलो. पत्ता विचारात परीक्षा केंद्रावर पण गेलो; मात्र परीक्षेची वेळ झाल्यानंतर आम्ही प्रवेश पत्र दाखविले असता त्यावरील पत्ता चुकीचा होता. यामध्ये आमची काहीही चूक नसताना आम्हाला विनाकारण परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.- सखाराम लोखंडे, नांदेड