शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची दररोज पायपीट

By admin | Updated: September 5, 2014 23:22 IST

पास मोफत; पण एस. टी. कुठाय ?.. ढेबेवाडी विभाग : गावोगावी माध्यमिक शिक्षण सुविधेची गरज

सणबूर : परीसरातील डोंगराळ भागातील गावोगावी आणी वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे मात्र त्या तुलनेत आजही विणले गेलेले नाही. शिक्षणासाठी अजूनही येथील विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपिट कायम आहे. ऊन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा. दररोज पाच ते दहा कि़ मी. पायपीट विद्यार्थ्यांना चुकलेली नाही.विभागातील दुर्गम डोंगराळ भागात स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक वर्ष मुलभूत सुविधांची कमतरता कायम राहिली. भौगोलीक अडचणींमुळे अनेक वर्ष जनतेच्या नशिबी वनवास आला. सध्या डोंगरवासीयांच्या गावात विकासाची पहाट होत आहे. रस्त्याबरोबरच इतर सुविधाही पोहोचू लागल्या आहेत. मात्र, शिक्षणाची परीपुर्ण सुविधा पोहोचायला अजून किती पिढ्या जातील, हे सांगणे तुर्त तरी कठीण आहे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर पोहोचली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची सोय अजुनही झालेली नाही. डोंगरभागात गावे आणि वाड्यावस्त्या विखरून आहेत. माध्यमिक विद्यालयांची संख्या मर्यादीत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. विभागातील निवी, कसणी, वरचे घोटील, आंब्रुळकरवाडी, सातर, निगडे आदी गावातील विद्यार्थी दररोज पायपीट करून माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जातात. अन्य ठिकाणच्या आणि सपाटीच्या काही गावातील विद्यार्थ्यांची स्थितीही त्यापेक्षा वेगळी नाही. बऱ्याच गावात एस. टी. ची सुविधा नसल्याने विद्यार्थी चालतच विद्यालयांमध्ये जातात. काहींच्या नशिबी १५ ते २० कि़ मी. ची पायपीट कायम आहे. काही गावांचा शाळेकडे जाण्याचा मार्ग ओढे आणी नद्यांतून असल्याने पावसाळ्यात या विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीवर परिणाम जाणवतो. (वार्ताहर)पास मोफत; पण एस. टी. कुठाय ?या भागातील मुलांबरोबरच मुलीही आता शाळा, महाविद्यालयात शिकु लागल आहेत. मात्र, शिक्षणासाठी हे विद्यार्थी उपसत असलेले कष्ट मोठे आहे. शासनाने अहिल्यादेवी होळकर योजनेद्वारे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थीनींसाठी एस.टी.च्या मोफत पासची सोय केली आहे. मात्र, अनेक गावांनी एस. टी. चे तोंडच पाहिले नसल्यामुळे मोफत पास मिळूनही विद्यार्थीनींना त्याचा फायदा नाही. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या हजारच्या घरात असली तरी फक्त दोनशे ते अडीचशे विद्यार्थीनीच पासचा लाभ घेत आहेत.