शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना विषबाधा अनागोंदी कारभारामुळेच !

By admin | Updated: April 7, 2016 00:03 IST

पाडेगाव आश्रमशाळा : जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून पाहणी; आरोग्याविषयी काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

लोणंद : पाडेगाव, ता. खंडाळा येथील समता आश्रम शाळेत मंगळवारी झालेल्या प्रकरणानंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन शाळेतील यंत्रणेची पाहणी केली. विद्यार्थी वसतिगृहाची कमालीची दुरवस्था पिण्याच्या पाण्याच्या टाकीची अस्वच्छता, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबतचा अभाव जाणवल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आश्रमशाळेच्या अनागोंदी कारभारामुळेच विद्यार्थ्यांची अशी दुर्दशा झाली असल्याचे निदर्शनास आणून संपूर्ण यंत्रणेचाच पोलखोल केला.समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाणीपुरवठा झाल्याने जुलाब, उलट्या अशा त्रासाने ग्रासले. त्यानंतर त्यांना लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, खंडाळा सभापती नितीन भरगुडे-पाटील, पं. स. सदस्या अनिता शेळके, समाजकल्याण अधिकारी साळी, अन्न तपासणी निरीक्षक यू. एस. लोकरे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. मुलांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर पाडेगाव येथील आश्रमशाळेची पाहणी केली. स्वयंपाकगृहाची अस्वच्छता, धान्य ठेवण्याकडे केलेले दुर्लक्ष तसेच निकृष्ट दर्जाची डाळ वापरत असल्याचे निदर्शनास आले. ज्या टाकीतून मुलांना पाणीपुरवठा केला जातो. त्याची स्वच्छता नव्हती. टाकीला शेवाळ चढले होते. तर त्यात कोणतेही प्रमाण न घेता टीसीएल टाकण्यात आले. या शाळेत ११०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ९०० विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यांच्याकडे आवश्यक रितीने लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने सभापती सुरेखा शेवाळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)पाण्याची परिस्थिती जैसे थेवसतिगृहातील ३३ विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब झाले. त्यापैकी गंभीर प्रकृती असणाऱ्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी आणखी काही मुलांना तसाच त्रास सुरू झाला. त्यांनाही लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या प्रकारानंतर वसतिगृहाच्या पाण्याची अवस्था जैसे थीच होती.शाळेकडून नेहमी स्वच्छता राखली जाते. सध्या ग्रामपंचायतीचे नळकनेक्शन बंद असल्याने कुपनलिकेचे पाणी वापरावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून यापुढे योग्य ती काळजी घेतली जाईल.- पवन सूर्यवंशी, संचालक, आश्रमशाळाविद्यार्थ्यांची विचारपूस मुलावर उपचार सुरू असल्याचे समजताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, लोणंदमधील भाजपाचे नेते विनोद क्षीरसागर, लक्ष्मणराव शेळके, अभिजित खंडागळे यांनी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली.