शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘टिळक’मधील विद्यार्थी रोबोटिक, थ्रीडीत अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:49 IST

संतोष गुरव।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : दिवंगत यशवंतराव चव्हाण व आॅलिम्पिक पदक विजेते पैलवान दिवंगत खाशाबा जाधव यांच्यासारख्या प्रभावीशाली व्यक्तींनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा म्हणून शिक्षण मंडळ कºहाडच्या टिळक हायस्कूलला ओळखले जाते. या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर ‘रोबोटिक’ अन् ‘थ्रीडी प्रिंटर’चे प्रभावीशाली शिक्षण दिले जाते. या शाळेतील विद्यार्थी हे ...

संतोष गुरव।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : दिवंगत यशवंतराव चव्हाण व आॅलिम्पिक पदक विजेते पैलवान दिवंगत खाशाबा जाधव यांच्यासारख्या प्रभावीशाली व्यक्तींनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा म्हणून शिक्षण मंडळ कºहाडच्या टिळक हायस्कूलला ओळखले जाते. या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर ‘रोबोटिक’ अन् ‘थ्रीडी प्रिंटर’चे प्रभावीशाली शिक्षण दिले जाते. या शाळेतील विद्यार्थी हे नासा तसेच इस्त्रोमध्येही कार्यरत आहेत.कºहाड शहराच्या मध्यवर्ती भागात १ आॅगस्ट १९२१ मध्ये लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ शिक्षण मंडळ कºहाडच्या टिळक हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना झाली. टिळक हायस्कूलमध्ये आजही शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना कला, मैदानी खेळ व साहसी खेळ, अभिनय, गायन, वादन, नृत्य, जीवन कौशल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाण घडवून देणारे असे विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते.आर्चरी, जलतरण, सॉफ्टबॉल, क्रिकेट, तायक्वांदो तसेच पारंपरिक कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स या खेळाचे विशेष प्रशिक्षण शाळेतर्फे दिले जाते. शाळेतील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये विजय मिळविला आहे.‘अटक टिकरिंग’ अनुदान प्राप्त जिल्ह्यातील पहिली शाळाशिक्षण मंडळ कºहाडची टिळक हायस्कूल ही केंद्रशासन पुरस्कृत ‘अटल टिकरिंंग लॅब’साठी अनुदान प्राप्त झालेली सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. या अटलच्या माध्यमातून शाळेस २०१६-१७ या वर्षी वीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून शाळेत रोबोटिक व थ्रीडी प्रिंटर आदींसह यंत्रमानव निर्मितीचे विद्यार्थ्यांना आकर्षक लॅबच्या माध्यमातून प्रशिक्षण व शिक्षण दिले जाते.नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सहभागटिळक हायस्कूलमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आॅलिम्पिक पदक विजेते दिवंगत खाशाबा जाधव, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, वि. स. पागे आदींनी या टिळक हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे.