शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही खडी फोडण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 17:36 IST

अधिकारीही येईनात : कामाच्या दजार्चे काय; ऐन पावसामध्ये बनपुरी-वडूज रस्ता मुरुमीकरण

आॅनलाईन लोकमतमायणी (जि. सातारा), दि. २४ : खटाव तालुक्यातील बनपुरी-येरळवाडी-वडूज या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. असे असतानाही रस्त्याचे काम सुरू आहे. ऐन पावसामध्ये मुरुमीकरण व खडी फोडण्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी या कामाचा दर्जा तपासणीसाठी येत नाही. त्यामुळे नेमके पाणी कोठे मुरत आहे, असा सवाल येरळवाडी व परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. बनपुरी, येरळवाडी ग्रामस्थांना कातरखटाव मार्गे वडूजला जावे लागत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होत होते. म्हणून या मागार्साठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वडूज, गणेशवाडी व बनपुरी या मागार्साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम करताना प्रथम मातीकाम, खडीकरण करणे यासह अनेक स्तरांची माहिती येथील फलकावर लिहली आहे. पण खरेच या पद्धतीने काम होत आहे का, हे अधिकाऱ्यांनी वेळच्यावेळी पाहणे गरजेचे आहे. असे असताना अधिकारी काय करतात, हा प्रश्न आहे. ग्रामस्थांनी तक्रार करूनही अधिकारी का येत नाहीत, या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू झाले, मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर पावसामुळे ठिकठिकाणे खड्डे पडून त्याठिकाणी रस्ताही खचला आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी अनेकवेळा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी तक्रार केली आहे. तरीही या कामाकडे अधिकारी फिरकले नाहीत, अशी तक्रार ही ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे नेमके पाणी मुरतंय कोठे हे काही कळेना, असे झाले आहे. काही असो अशी कामे अनेक वर्षांतून मंजूर होतात. त्यासाठीही एकदाच निधी दिला जातो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाच्या दजार्बाबत लक्ष देणे गरजेचे आहे. इतर तालुक्याच्या दृष्टीने खटाव तालुक्यातील रस्त्याची वाईट अवस्था आहे. रस्त्यावर खड्डा आला की खटाव तालुका आला, असे प्रवासी बोलतात. त्यामुळे रस्त्याचे काम चांगले होणे आवश्यक आहे. सध्या या रस्त्याबाबत ठेकेदाराची चूक आहे का? त्यावर लक्ष ठेवणाऱ्या संबंधित विभागाची हे कोडे उलगडत नाही. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनीच लक्ष घालणे महत्त्वाचे ठरत आहे. संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरील खडी बाजूला केली नाही तर येत्या दोन दिवसांत येरळवाडीतील युवकांच्या सहकायार्तून व ग्रामस्थांची मदत घेऊन खडी बाजूला करण्याचे काम हाती घेणार आहोत. त्यानंतर रस्ता पूर्ववत करून विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबवणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीची सेवा सुरू करावी, यासाठी विनंती करणार आहे. - योगेश जाधव, सामाजिक कार्यकर्ता, येरळवाडी