शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

कोरेगावच्या माळरानात स्ट्रॉबेरीचे मळे

By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST

शेतकऱ्यांची प्रतिकूल हवामानावर मात : सर्कलवाडी, वाघोली, चौधरवाडी, वाठारस्टेशन, तळिये येथे लागवड

संजय कदम - वाठार स्टेशन -- हवामानानुसार पीक परिस्थिती असलेल्या सातारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोणतीही पीक परिस्थिती कोणत्याही भागात पाहायला मिळत आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर विभाग हा कमी पावसाचा दुष्काळी पट्टा असल्याने या भागात कमी पाण्यावरील पिकांचे उत्पादन घेण्यात येते. यामध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस ही प्रमुख पिके आहेत; परंतु गेल्या काही वर्षांपासून कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी माळरानावर महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीची शेती फुलू लागली आहे.सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर, पाचगणी याच भागाच नाव घेतलं जात होतं. मात्र, आता कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्कलवाडी, वाघोली, चौधरवाडी, वाठारस्टेशन व तळिये या गावांनाही स्ट्रॉबेरीने भुरळ घातली असून, येथील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती फुलवू लागले आहेत.तळिये शिवारात देऊर येथील बाळासाहेब पिसाळ या शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात पाच महिन्यांपूर्वी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड ठिबक सिंचन वर केली. या पिकाबाबत कोणताही अभ्यास माहीती नसताना त्यांनी २० गुंठ्यात उत्तम प्रकारे स्ट्रॉबेरी चे व्यवस्थापन करीत आजअखेर जवळपास ३.५० लाखांचे उत्पादन घेतले आहे. अजून किमान महिनाभर त्यांना या माध्यामातून अंदाजे दीड लाखाचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे.चांगल्या नियोजनाचा योग्य मोबदलास्ट्रॉबेरी या पिकाबाबत कोणतीही माहिती नसताना या पिकाची २० गुंठे क्षेत्रात लागवड केली. पाण्याच्या कमतरतेमुळे ठिबक सिंचन प्रणाली राबवली. सुरुवातीच्या काळात या फळाला दोनशे रुपयांपर्यंत दर मिळाला. आज ७० ते ८० रुपये दर मिळत आहे. योग्य नियोजन केल्यास कोणत्याही हवामानाशिवाय आपल्या भागातही स्ट्रॉबेरी हे पीक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल.- बाळासाहेब पिसाळ,शेतकरी देऊर.