शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तणाव; रामराजेंकडे निघालेल्या उदयनराजेंना अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:03 IST

खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे दोन नेते मंगळवारी येथील विश्रामगृहावर समोरासमोर भिडण्याची शक्यता होती.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे दोन नेते मंगळवारी येथील विश्रामगृहावर समोरासमोर भिडण्याची शक्यता होती. रामराजे ज्या सूटमध्ये बसले होते, तिकडे बाह्या वर करून निघालेल्या उदयनराजेंना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी वेळीच रोखले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांसमोर राग व्यक्त करून उदयनराजे निघून गेले.सातारा जिल्हा बँकेतील बैठक संपल्यानंतर रामराजे सायंकाळी विश्रामगृहातील ‘अजिंक्यतारा’ या सूटमध्ये बसले होते. याची माहिती मिळताच सायंकाळी पाचच्या सुमारास उदयनराजे हेही विश्रामगृहावर आले. त्यांनी थेट ‘प्रतापगड’ सूट गाठला. ‘उदयनराजे येणार व तणाव वाढणार...’ हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विश्रामगृहावर मोठा पोलीस बंदोबस्त आधीच ठेवला होता.उदयनराजे ‘प्रतापगड’ सूटमधून उठून बाहेर आले. रामराजे ज्या सूटमध्ये बसले होते, तिकडे जायला निघाले तेव्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुत्सद्देगिरी दाखवत पुढे होऊन उदयनराजेंशी शेक हँड करत गप्पा मारायला सुरुवात केली. यावेळी उदयनराजे काही पुटपुटत होते. ‘कसला भगीरथ... याने जिल्ह्याची वाट लावली...,’ असे बोलतच उदयनराजे पुन्हा आपल्या वाहनात जाऊन बसले.दरम्यान, काही दिवसांपासून रामराजे व उदयनराजे या दोन नेत्यांत वाक्युद्ध सुरू आहे. एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यावर दोघांचाही भर असल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. काहीही घडू शकते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक दक्षता घेतली आहे. विशेषत: सातारा व फलटण या दोन शहरांत तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे निघून गेल्यानंतरही विश्रामगृहावर मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. रामराजे निघून गेल्यानंतरच पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला.योग्य वेळी बोलेन - रामराजेकाही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी रामराजेंची भेट घेऊन मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘मी योग्य वेळी बोलेन,’ इतकंच रामराजेंनी स्पष्ट केलं.संदीप पाटील यांची मुत्सद्देगिरीपोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुत्सद्देगिरी दाखविल्याने विश्रामगृहावर काही अघटित घडले नाही. त्यांनी योग्य वेळी बंदोबस्त लावला, तसेच उदयनराजेंशी चर्चा केली, तणाव निवळल्याची चर्चा विश्रामगृहावर सुरू होती.