वाठारस्टेशन : जाधववाडी, ता. कोरेगाव येथील पाणलोट विकास कार्यक्रमअंतर्गत पाच लाख ६२ हजार २२० रुपये खर्चून साकारलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जामुळे पाणीसाठा होण्यापूर्वीच तो रिकामा झाला आहे. या कामात पाणलोट समिती, ठेकेदार यांच्या खर्चाचा सात ‘अ’, सातबारा वर माहितीच्या अधिकारात उघडा पडला आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी लागणारी वाळू, पाणी, दगड ही याच ठिकाणी वापरून बिलात मात्र याची खरेदी २५ ते ४५ किलोमीटर अंतरातून वाहतूक करून आणल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करावी; अन्यथा वाठारस्टेशन मंडलाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा वाठारस्टेशन पंचायत समितीच्या सदस्या रूपाली जाधव यांच्यासह जाधववाडीत ग्रामस्थांनी दिला आहे.जाधववाडी गावाअंतर्गत २०१० पासून २२ मे २०१४ अखेर मृदसंधारण माहिती, बियाणे वाटप, पाणलोट समिती, प्रोसिडिंग येथील श्रीमंत भाऊसाहेब वाघ यांनी माहिती अधिकारात या बाबतची माहिती मागविली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार गावात मृदसंधारणअंतर्गत १३ छोटे बंधारे अंदाजे १९ लाखांचे साकारले गेले आहेत. यामध्ये कोणत्याही ठिकाणी पाया न खोदता काळी माती न भरता हे काम केले गेले आहे. तसेच गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीनचे वाटप चुकीचे करून एका घरात ते वाटप करण्यात आले आहे. तसेच असणाऱ्या पाणलोट समितीचे कोणत्याही गोष्टीत न पाहताच ठराव घेऊन या कामाची पाठराखण केल्याची बाब उघड झाली आहे.राज्य शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमअंतर्गत शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून झालेल्या लाखो रुपयांच्या कामाचा छडा लावणे गरजेचे आहे. ज्या गोष्टी जाग्यावर घेतल्या, त्या वापरल्या त्याची बिल मंजूर कशी झाली? या सर्वच कामाची चौकशी तातडीने व्हावी, अशीही मागणी वाघ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुलेसहा जिल्ह्यांतील सर्व्हे : ६६ टक्के मुला-मुलींनी दिली पोर्न वेबसाईटस् पाहिल्याची कबुली; सातारा जिल्ह्यात मात्र परिस्थिती आटोक्यातसातारा : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, मुंबईतील कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यातील ६ जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. मात्र, या मोठ्या शहरांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुले-मुली थोडीशी सावधही आहेत. ‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात राज्यातील मुंबई, कल्याण, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांत १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात १० ते १४ वर्षे वयोगटातील १५२, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३३६ व १९ वर्षांवरील १२ जणांचा समावेश होता. यात १९२ मुली व ३०८ मुलांना सहभागी करण्यात आले. १९८ मुला- मुलींनी वयाच्या १० वर्षांपासून, तर ३०२ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. ६७ टक्के मुला- मुलींनी सांगितले की, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले आहेत. ७४ टक्के जण इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत. ५५ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत, तर ६० टक्के जण चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ७७.६ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. धक्कदायक बाब म्हणजे यातील ६६.२ टक्के मुला- मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ४२.२ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले.सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैन थांबत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हातळावा अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात याबाबतची परिस्थिती आटोक्यात असली तरी पालकांनी आतापासूनच सतर्क राहणे अत्यंत गरजेचे. (प्रतिनिधी)४कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेश शेळके, सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता कुलकर्णी, प्रा. युसूफ बेन्नुर व प्रा. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व्हे एप्रिल-मे २०१४ दरम्यान राज्यातील ६ जिल्ह्यांत करण्यात आला. रेणुका कड, मयुरी मालवी, करुणा महंतारे, सरिता तिवारी, कविता सरविय्या यांनी सर्व्हे केला. सहा जिल्ह्यांतील १० ते १९ वर्षे वयोगटातील ५०० मुला- मुलींशी संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका भरून घेण्यात आली. त्यातून रँडम सॅम्पलिंग पद्धतीने सारणी, विश्लेषण, शोध आणि शेवटी निष्कर्ष काढण्यात आले.
पाणी साठण्यापूर्वीच बंधारा रिकामा
By admin | Updated: June 26, 2014 00:41 IST