शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसेसमुळे रास्ता रोको

By admin | Updated: October 9, 2016 00:21 IST

कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर पार्किंग : नागरिक आक्रमक; पोलिसांची धावपळ; उपमार्गावर कोंडी

मलकापूर : येथील कोल्हापूर नाक्यावर खासगी बस अस्ताव्यस्त पार्किंग केल्या जात असल्याने नागरिकांनी आक्रमक होऊन अचानक उपमार्गावर रास्ता रोको केला. त्यावेळी उपमार्गावर वाहतूक कोंडी होऊन पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. उपमार्गावरून संबंधित बस हटवल्यानंतरच नागरिकांनी रस्त्यावरील ठिय्या सोडला.येथील खरेदी-विक्री संघाचा पंप ते कोल्हापूर नाका परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. नेहमीप्रमाणे बस चालकांनी सोमवारी कोल्हापूर नाका परिसरात उपमार्गावरच पार्किंग केल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यावेळी उपमार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी संबंधित बसचालकांना बस बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र संबंधित चालकांनी बस बाजूला घेण्याऐवजी नागरिकांनाच उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा वापरली. संबंधित बसचालकाच्या उद्धटपणामुळे आक्रमक होऊन नागरिकांनी आपापली वाहने रस्त्यावर उभी करून अचानक रास्ता रोको केला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळाने पोलिस घटनास्थळी आले. त्यावेळी नागरिकांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काही संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावर बसले. जोपर्यंत संबंधित बस चालक व मालकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही, अशी भूमिका घेत सुमारे अर्धा तास उपमार्गावर ठिय्या मांडला.पोलिसांनी यापुढे उपमार्गावर बस थांबणार नाहीत, अशी हमी देत संबंधित बस हटवल्यानंतरच नागरिकांनी उपमार्ग वाहतुकीस खुला केला. यावेळी उपमार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. ती कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली.दरम्यान अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहनचालकांचीही धांदल उडाली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)पार्किंग केल्यास पुन्हा आंदोलनअनेकवेळा सांगूनही खासगी प्रवासी वाहतूक करणारे राजरोसपणे उपमार्गावर अतिक्रमण करतात. रात्रीच्या वेळी तर उपमार्गाबरोबरच महामार्गावरून बेकायदेशीर पार्किंग करून वाहतुकीची कोंडी करतात. याला सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. यापुढे अशा पद्धतीने बेकायदेशीर पार्किंग झाल्यास पुन्हा असेच तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी पोलिसांना यावेळी दिला.लोखंडी जाळी काढून रिक्षाला मार्गकोल्हापूर नाक्यावर नागरिकांनी अचानक रास्ता रोको केला. त्यावेळी उपमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. शेवटी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महामार्ग आणि उपमार्गामधील लोखंडी जाळी काढून रिक्षाला मार्ग करून दिला.