शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी मुलगा बनला बहुरुपी, गावोगावी भटकंती : हजरजबाबीपणामुळे ग्रामस्थांची करमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:18 IST

कोपर्डे हवेली : खेळण्या बागडण्याचे, मौजमजा करण्याचे दिवस सोडून गावोगावी भटकरणारा एक मुलगा सध्या लोककला जिवंत ठेवण्याचे काम करतोय. शिक्षण घेण्याचे, नवं काही तरी शिकण्याचे दिवस असताना तो

शंकर पोळ।कोपर्डे हवेली : खेळण्या बागडण्याचे, मौजमजा करण्याचे दिवस सोडून गावोगावी भटकरणारा एक मुलगा सध्या लोककला जिवंत ठेवण्याचे काम करतोय. शिक्षण घेण्याचे, नवं काही तरी शिकण्याचे दिवस असताना तो पोटाची खळगी भरण्यासाठी बहुरुपी होऊन गावोगावी भटकतोय.संजय जाधव हा अवघ्या पंधरा वर्षांचा मुलगा आपल्या चेहऱ्यावरील दु:ख लपवून दुसºयांची करमणूक करीत फिरत आहे. पोटासाठी फिरावे लागत असल्याने त्याचे भविष्य अंधारमय ठरू लागले आहे. चार रुपयापासून दहा रुपयांपर्यंतचे बक्षीस लोक त्याला देतात. गर्दीच्या ठिकाणी हा बाल बहुरुपी लोकांची करमणूक करताना दिसतो. लहानपणात त्याच्यावर बहुरुपी व्यवसायाचे संस्कार झाल्याने तो निर्भीडपणे लोकांच्यात समरस होऊन करमणुकीबरोबर लोककलाही जतन करतो. कºहाड तालुक्यातील गावोगावी त्याची भटकंती सुरू आहे. चेहºयावर हास्य असले तरी पोटाची आग घेऊन रस्तोरस्ती तो फिरताना दिसतो.बहुरुपी ही कला फार वर्षांपासून चालत आली आहे. ऐतिहासिक कालखंडाचा विचार केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातही या कलेचा उल्लेख आढळून येतो. बहुरंगी बहुरुपी आपल्या बोलण्याच्या आणि अभियानयातून समोरच्याची फिरकी घेतात. त्यांच्या अनेक पिढ्या वंश परंपरागत व्यवासाय करत आल्या आहेत.सध्याच्या काळात बहुरुपींची पिढी शिकत असल्याचे दिसत असले तरी काहींची मुले शिक्षण सोडून गावोगावी फिरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही मुलांचे दाखले शाळेत आहेत. मात्र, त्यांची पोटासाठी भटकंती सुरू आहे. कोपर्डे हवेली परिसरात संजय जाधव या मुलाची गावोगावी पायपीट सुरू आहे. त्याच्या बोलण्यातील लकब अनेकांना वेड लावत आहे. हातातील नकली प्लास्टिक बंदूक लक्ष वेधून घेत आहे.कोपर्डे हवेली, ता. कºहाड येथे बहुरुपी मुलाने ग्रामस्थांची करमणूक केली.