शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेले शेततळे पुन्हा अवतरणार?

By admin | Updated: May 7, 2016 00:52 IST

चांदकमधील गोलमाल : प्रकरण दडपणाऱ्यांचे धाबे दणाणले--बातमीनंतरची बातमी

भुर्इंज : चांदक, ता. वाई येथे शेततळे न खोदताच लाखांची रक्कम हडप करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात सहभागी असणारी साखळी हादरली असून, हे प्रकरण उघडकीस आल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी संबंधित जागेवर शेततळे खोदण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.मुळातच शेततळे खुदाईची वर्क आॅर्डर दिल्यानंतर कामाची वेळोवेळी पाहणी करून त्या कामाच्या पूर्ततेनुसार रक्कम अदा करण्याचा नियम आहे. चांदक येथील विश्वास भिलारे यांच्या शेतात कागदोपत्री शेततळे खोदल्याचे दाखवून दीड लाखाहून अधिक रक्कम अशाच प्रकारे खर्ची टाकण्यात आली आहे. कृषी विभागाच्या दप्तरी हे शेततळे असले तरी प्रत्यक्षात ज्या भिलारे यांना शेततळे मंजूर केले होते ते प्रत्यक्षात मात्र नाही. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि त्याची पाहणी करूनच कृषी विभागाने सर्व अनुदान देणे बंधनकारक आहे. मात्र येथे भलतेच घडले असून, भिलारे यांच्या शेततळे कामावर दाखवलेली मजूर यादीही बोगस असल्याचे दिसून येत आहे. कारवाई होण्याची भीती निर्माण झाल्याने भिलारे यांच्या शेतात गुपचूपपणे शेततळे खोदण्यासाठी संबंधितांची धडपड सुरू आहे. मात्र संबंधित गट नंबरमध्ये ऐनवेळी शेततळे खोदून ते आधीच खोदले असल्याचा बनाव ग्रामस्थांनी उघडकीस आणत पुराव्यानिशी तक्रार केली आहे. या प्रकरणातील शासनाची पैन् पै वसूल करून दोषींवर कारवाई करू, अशी ग्वाही कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी चांदक ग्रामस्थांना दिली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, याची काटेकोरपणे चौकशी केली जाईल, असे देशमुख यांनी चांदक ग्रामस्थांना सांगितले. चांदक येथील विश्वास भिलारे यांच्या शेतातील गट नं. ९५४ ची पाहणी व पंचनामा करून आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर यांनी दिली. (वार्ताहर)