वाई : येथील किसन वीर महाविद्यालयात ‘वाणिज्य व व्यवस्थापनातील आधुनिक प्रवाह’ या विषयावर शनिवार, दि. २४ जुलै रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, संशोधन समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या वेबिनारसाठी उद्घाटक व बीजभाषक म्हणून जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जे. एस. चौधरी उपस्थित राहणार आहेत. प्रथम सत्रामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य उदय गुजर हे ‘वित्त व वाणिज्य क्षेत्रातील संधी व आव्हाने’ यावर मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन व विद्या परिषद सदस्य डॉ. रसूल कोरबू हे ‘वाणिज्य व व्यवस्थापनाच्या संशोधनातील नवी क्षितिजे’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव भूषविणार आहेत, अशी माहिती वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे उपप्राचार्य व या वेबिनारचे संयोजक प्रा. विलास करडे, संशोधन समिती समन्वयक डॉ. सुनील सावंत व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे यांनी दिली.