शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा समारोप

By admin | Updated: July 10, 2015 00:35 IST

पारितोषिक वितरण : पृथ्वीराज चव्हाण, राजेंद्र मुळूक यांची उपस्थिती

कऱ्हाड : प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने येथील शिवाजी स्टेडियमवर राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा बुधवारी समारोप झाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल चव्हाण, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक श्रीकांत मुळे, जावेद शेख, आदी उपस्थित होते. १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या एकेरी स्पर्धेत साई रेड्डी विजेता तर दिप रंभिया उपविजेता ठरला. तर याच वयोगटातील मुलींमध्ये वैदेही चौधरी विजेती तर स्मिथ तोषीवाल उपविजेती ठरली. मुलींच्या दुहेरी स्पर्धेत ऋतिका ठक्कर व सिमरन सिंग विजेती व अदिती कुठे, राधिका दाघोनकर उपविजेता ठरली. १९ वर्षे मुलांच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत अमन संजय, रिया आरोलकर ही जोडी विजेती ठरली तर साई रेड्डी, अक्षय वारंग ही जोडी उपविजेती ठरली. १९ वर्षे मुलांच्या दुहेरी स्पर्धेत निहार केळकर, पारूश कुलकर्णी ही जोडी विजेती तर दिप रंभिया व प्रसन्नजित शिरोडकर ही जोडी उपविजेती ठरली. १९ वर्षे मुलींच्या एकेरी स्पर्धेत मृण्मयी संज्योती ही विजेती तर वैदेही चौधरी ही उपविजेती ठरली, १९ वर्षे मुलांच्या एकेरी स्पर्धेत आर्या भिवपत्की हा विजेता तर विनित कांबळे हा उपविजेता ठरला. १९ वर्षे मुलींच्या दुहेरी स्पर्धेत रितीका ठक्कर, सिमरन सिंग ही जोडी विजेती तर अक्षया वारंग, करीना मदन ही उपविजेती जोडी ठरली. १७ वर्षे मुलांच्या दुहेरी स्पर्धेत निखील वाडेकर, साई रेड्डी ही जोडी विजेती व दिप रंभिया, सौरभ केराळकर यांनी उपविजेते पद पटकावले.चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, धुळे, नागपूर, सातारा, सांगली आदी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते. पाच दिवस पार पडलेल्या राज्यस्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत या स्पर्धेत ४५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली होती. (प्रतिनिधी)