शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी: महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:21 IST

म्हसवड : ‘राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामे केली; मात्र निसर्गाची साथ मिळाली नसल्याने राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती ...

म्हसवड : ‘राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामे केली; मात्र निसर्गाची साथ मिळाली नसल्याने राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सध्या आठ लाख जनावरे सरकारी छावणीत दाखल झालीआहेत. जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, जिहे कटापूर योजनेचे पाणी लवकरच माण तालुक्यात येणार आहे. राज्य सरकार दुष्काळाच्या परिस्थितीत संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे,’ अशी ग्वाही मंत्री महादेव जानकर यांनी दिली.पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे रविवारी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. त्यांनी माण तालुक्यातील माळवाडी (वरकुटे), म्हसवड व मोगराळे येथील जनावरांच्या चारा छावणीत भेट दिली. मार्डी, गोंदवले येथे कुदळ, फावडे हाती घेऊन श्रमदान करून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढू, अशी ग्वाही जानकर यांनी दिली.राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तत्काळ मार्ग काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाग्रस्त भागात मंत्र्यांनी दौरे काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे सातारा जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी माळवाडी (वरकुटे) येथील जनावरांच्या चारा छावणीस भेट दिली.यावेळी शेतकºयांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत सरकार दुष्काळग्रस्तांसाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.त्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजता मार्डी येथील आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदानात सहभागी होऊन कुदळ, फावडे हाती घेत श्रमदानही केले. गोंदवले खुर्द गावातही महाश्रमदान केले. दुपारी म्हसवड येथील माणदेशी व मोगराळे येथील चारा छावणीस भेट दिली. यावेळी शेतकºयांसोबत चारा छावणीत भोजन केले.यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, राज्य कार्यकारणी सदस्य बबन वीरकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, रासपाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब दोरगे, माण-खटाव विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा घाडगे, तालुकाध्यक्ष शुभांगी फडतरे, तालुकाध्यक्ष सीमा बनसोडे, श्रीकांत देवकर, खटाव तालुकाध्यक्ष डोईफोडे उपस्थित होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मोठे संख्येने उपस्थित राहून श्रमदानात सहभागी झाले.गजीनृत्याने केले स्वागत..मार्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत ढोल, ताशा, सनई, बँड आणि गजी नृत्याच्या तालात करण्यात आले. यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना पुन्हा ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी जलसंधारण कामाच्या ठिकाणी चाललेल्या गजीनृत्यात पुन्हा ढोल बडवला.