शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरेगाव तालुक्यात आले लागवडीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:28 IST

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक परिसरात पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाघोली, आसनगाव, चौधरवाडी, सर्कलवाडी, अनपटवाडी, करंजखोप, ...

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक परिसरात पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाघोली, आसनगाव, चौधरवाडी, सर्कलवाडी, अनपटवाडी, करंजखोप, सोनके, देऊर आधी परिसरामध्ये गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तसेच तौक्ते वादळाच्या प्रभावामुळे या परिसरामध्ये चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पिंपोडे बुद्रुकसह परिसरामध्ये आले लागवडीस सुरुवात केली आहे.

कोरोनोच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकता आला नाही. हा शेतीमाल विकला न गेल्यामुळे आले लागवडीसाठी पुरेसे पैसेही नसल्यामुळे शेतकऱ्यांना आले लागवडीसाठी कसरत करावी लागत आहे. पिंपोडे बुद्रुक परिसरामध्ये गेल्या दहा वर्षांपासून आल्याचे उत्पादन घेतले जाते.

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने या भागात आले लागवड केली होती. यंदाही गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे या परिसरामध्ये आले लागवड पूर्व शेतीची मशागतीची कामे पूर्ण झाली असून, मागील चार दिवसांपासून या परिसरामध्ये मजुरांच्या साह्याने आले लागवड सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने बदलत्या हवामानात प्रतिकूल परिस्थितीतही आले पीक काही ना काही, शाश्‍वत उत्पादन देत आले आहे. येथे औरंगाबादी (सातारी ), उदयन पुरी, सुप्रभात या जातींच्या आल्याच्या लागवडी सुरू आहेत. सोमवारी परिसरामध्ये दुपारनंतर चांगला पाऊस झाल्याने आल्याच्या लागवडी पूर्ण बंद कराव्या लागल्या.

कोट...

शेतीची मशागतपूर्व कामे पूर्ण झाली होती. याचा चांगला फायदा आले लागवडीनंतर उगवणक्षमतेवर होतो. वातावरण पोषक असल्याने आले प्रतिगाडी आठ ते दहा हजार पाचशे रुपये इतक्या दराने घेत आहे.

-सुनील निकम, प्रगतशील शेतकरी, पिंपोडे बुद्रुक