शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
3
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
4
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
5
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
6
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
7
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
8
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
9
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
10
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
11
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
12
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
13
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
14
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
15
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
16
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
17
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
18
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
19
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
20
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले

वाई बाजार समितीत उच्चांकी दराने हळदी विक्रीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 19:14 IST

मार्केट यार्ड आवाराबाहेर शेतकऱ्यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाराबाहेर मालाची विक्री करू नये. नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडिंग करून मार्केटवर त्यांची विक्री करावी. सर्व आडत व्यापा-यांनी नियमितपणे लिलाव काढावा व शेतक-यांना पेमेंट द्यावे,’ अशा सूचनाही दिल्या

वाई : वाई बाजार समितीत १२८३ पोती नवीन हळदीची आवक झाली. जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते नवीन हळदीच्या लिलावाचा प्रारंभ झाला. उत्तम पिसाळ यांच्या हळदीला प्रति क्विंटल १० हजार १११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. हळदीचा दर प्रति क्विंटल ७ हजार ५०० ते १० हजार ११२ रुपये निघाला.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पिसाळ म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी आपला हळद माल निवडून स्वच्छ करून, वाळवून मार्केट यार्डवर लिलावासाठी आणावा.

मार्केट यार्ड आवाराबाहेर शेतकऱ्यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाराबाहेर मालाची विक्री करू नये. नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडिंग करून मार्केटवर त्यांची विक्री करावी. सर्व आडत व्यापा-यांनी नियमितपणे लिलाव काढावा व शेतक-यांना पेमेंट द्यावे,’ अशा सूचनाही दिल्या.

यावेळी प्रमोद शिंदे, व्यापारी हिराशेठ जैन, रवी कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसभापती दीपक बाबर यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार मांढरे यांनी स्वागत केले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव पिसाळ, अ‍ॅड. उदयसिंह पिसाळ, दिलीप पिसाळ, शशिकांत पवार, कांतीलाल पवार, मोहन जाधव, संचालक विक्रमसिंह पिसाळ, विजयकुमार मांढरे, कुमार जगताप, राजेंद्र सोनावणे, दत्तात्रय जमदाडे, हारुणभाई बागवान, गणेश बनसोडे, शारदा गायकवाड, बबई लोळे, नामदेव हिरवे, व्यापारी मोहन ओसवाल, कांतीलाल ओसवाल, मिठालाल जैन, कांतीलाल भुरमल, शंकरलाल ओसवाल, मदनलाल ओसवाल, प्रवीण ओसवाल, कन्हैया गांधी, विनोद पावशे, शंकर जाधव, सचिन जेधे, बाळासाहेब आचफळे, प्रभारी सचिव राजेंद्र कदम, शेतकरी, हमाल, खरेदीदार, कर्मचारी उपस्थित होते.तालुक्यात नऊशे हेक्टरवर उत्पादनवाई तालुक्यात नऊशे हेक्टर हळदीचे क्षेत्र आहे. ओल्या हळदीचे उत्पादन सोळा ते अठरा टन उत्पादन असून, वळून चार ते पाच टन उत्पादन होते. वाई बाजार समितीमध्ये वाई तालुक्यासह जावळी, खंडाळा व कोरेगाव तालुक्यातून हळद विक्रीसाठी येत असते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी दिली. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजार