शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या प्रवासाला ‘शिक्क्यांचे’ अडथळे!

By admin | Updated: October 15, 2015 00:31 IST

एसटी कंडक्टरांचा अजब नियम : ओळखपत्र चालत नसल्याचा फतवा

सागर गुजर - सातारा -शासनाचे वाहन म्हणून सर्वसामान्यांसाठी आधार ठरणारी एसटी सध्या अपंगांवर नाराज झाल्याचे चित्र आहे. अपंगांना एसटी प्रवासात सवलत म्हणून देण्यात आलेले ओळखपत्र चालत नसल्याचा अलिखित फतवा काही वाहकांकडून काढला गेला आहे. या ओळखपत्रावर ‘कायमस्वरूपी’ हा शिक्का आणण्याचा अजब कारभार सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार अपंग एसटीच्या सवलतीचा लाभ घेत आहे. अपंग असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मिळते. या आधारावर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून अपंगांना एक ओळखपत्र मिळते. अपंगत्व ४० टक्क्यांच्यावर असेल तर अशा अपंगांना एसटी प्रवासामध्ये ७५ टक्के सवलत मिळते. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी हे कायमस्वरूपी ओळखपत्र असून १८ खाली व्यक्तींनी दर पाच वर्षांनी हे ओळखपत्र नवीन घ्यावेत, अशी अट आहे. त्याबाबतचा उल्लेख ओळखपत्रावर आहे. सध्या मात्र शासनाच्या आदर्श सूचनांना हरताळ फासत ओळखपत्र कालबाह्य ठरविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. अपंग एसटी प्रवासावेळी हे ओळखपत्र दाखवितात, तेव्हा अनेक वाहक ते नूतनीकरण करून आणा असे सांगतात. याबाबत सातारा आगाराशी संपर्क साधला असता अपंगांच्या ओळखपत्रांवर शिक्के मारून दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अपंग ओळखपत्रांवर शिक्के मारण्यासाठी अपंगांना धावपळ करत एसटी आगार गाठावे लागत आहे. दिसला अपंग, काढ बसमधून बाहेर!अपंग व्यक्ती प्रवास करताना दिसला की ओळखपत्र पाहून खाली उतरविण्याच्या सूचना अनेकवेळा केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब अपंगांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी संबंधित यंत्रणेने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.शिक्क्याने मिटणार अडचणीएसटी प्रशासनाच्या सूचनेनुसार अपंगांना मिळालेल्या ओळखपत्रांवर कायमस्वरूपी असा शिक्का मारण्यात येतो. एसटीच्या आगारात त्यांनी तो मारून घेतल्यास त्यांना प्रवासात सवलत मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही.- नौशाद तांबोळी, आगारप्रमुख, सातारा.नियम काय सांगतो...केंद्र शासनाचे पत्र क्रमांक १६.२१/९७-१३ दि. १ आॅक्टोबर २००४ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार अपंग व्यक्तीस ओळखपत्र देणेबाबत आदेशित केले आहे.१८ वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या अपंगांना हे कायम ओळखपत्र देण्यात येत आहे.१८ वर्षांखालील शारीरिकदृष्ट्या अपंगांनी दर पाच वर्षांनी ओळखपत्र नवीन घेण्यात यावे.ओळखपत्र हरविल्यानंतर दुसरे नवीन ओळखपत्र काढण्याचा नवीन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे व माहिती तसेच त्यासोबत शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे.हे ओळखपत्र अहस्तांतरणीय आहे, व ज्याच्या नावाने देण्यात आले आहे, त्याने ते ठेवावे व वापरावे.