शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

वाईनजीक अपघातात एसटी उलटली

By admin | Updated: January 4, 2017 23:10 IST

आठ प्रवासी जखमी : टेम्पोच्या धडकेनंतर चालकाचा ताबा सुटला

वाई: वाई-किरुंडे एसटी व टेम्पोची समोरासमोर धडक झाल्यानंतर एसटी ओढ्यात कोसळली. यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर वाईतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजता वेलंग येथे झाला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाई आगारातून सुटणारी वाई-किरुंडे एसटी (एमएच १४ बीटी २१५७) किरुंडेकडे निघाली होती. वेंलग येथील पानस वस्तीजवळ ही एसटी आली असता आसरे कडून वाईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टेम्पोची एसटीला धडक बसली. त्यामुळे एसटी पलटी होऊन ओढ्यात कोसळली. यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले़ वळणावरील तीव्र उतारावर बसचालकाला अचानक टेम्पो दिसला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.या अपघातानंतर जखमी झालेल्या प्रवाशांनी परिसरातील नागरिकांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील अशोक मांढरे, विशाल सपकाळ, संतोष शिंदे यांच्यासह इतर नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी जखमी प्रवाशांना एसटीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली़ बसमध्ये किरुंडे गावचे उपसरपंच मनोज मांढरे हे होते. त्यांनी अशोक मांढरे यांना फोनवरून याची माहिती दिली. मांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मित्रांच्या मदतीने स्वत:च्या गाडीतून काही प्रवाशांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले़ उर्वरित प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी दुसऱ्या बसमधून वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)एसटीतील जखमी प्रवासी प्रियांका सणस, मुक्ता सणस, सविता सणस (रा.़ रेणावळे), सुरेश चिकणे (रा. जांभळी), सुजाता दानवले (रा़ वासोळे), शारदा कोंढाळकर (रा. कोंढावळे), सखाराम चिकणे (वडवली), वाहक केदारे यांचा समावेश आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे़.