शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अंबेनळी घाटात एसटी-खासगी बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:30 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील अंबेनळी घाटात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी व खासगी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील अंबेनळी घाटात मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी व खासगी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात एसटी बसचालकाने दाखवलेल्या अप्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत माहिती अशी की, अहमदनगर येथील देसरडा भंडारे प्रोफेशल अ‍ॅकॅडमीचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी असे १२० जण तीन बसमधून महाबळेश्वरला सहलीसाठी आले होते. बुधवारी सकाळी ते सर्वजण प्रतापगड किल्ल्यावर गेले होते. तेथून ते पुन्हा अंबेनळी घाटातून महाबळेश्वर येथे परतत होते. खासगी बस घाट चढून एका वळणावर आल्या. दरम्यान, महाबळेश्वर बसस्थानकातून महाबळेश्वर-महाड ही बस (एमएच १४ बीटी ३८४९) मार्गस्थ झाली होती. ही बस अंबेनळी घाट उतरत असताना खासगी बस (एमएच १६ बीसी २४५१) समोर आली.खासगी बसचालक शेपराव बुवा खेडकर याचा बसवरील ताबा सुटल्याने तो डाव्या बाजूवरून उजव्या बाजूला गेला. एसटी बसचे चालक अतुल चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, खासगी बस एसटीच्या समोरील भागाला आदळली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान होऊन बसमधील प्रवासी जखमी झाले. एसटी बस थांबली नसती तर मोठा अपघात होऊन अनर्थ घडला असता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघातात दोन्ही बसमधील साधारण आठ प्रवासी जखमी झाले. एसटीमधील प्रवाशांना महाबळेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर खासगी बसमधील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. या अपघातात अंबेनळी दूरक्षेत्रावरील पोलीस बाजीराव चौधरी, महाबळेश्वर बस आगार प्रमुख नामदेव पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.