शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना बाजूला सारून स्वतंत्र फळी !

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

शिवेंद्रराजेंची व्यूहरचना : निवडणूक निकालाचा बोध घेऊन थेट जनतेशी संपर्क साधण्यावर भर--बातमीमागची बातमी...

दत्ता यादव - सातारा  -विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शहरामध्ये मताधिक्य कमी पडले होते. काही स्थानिक नगरसेवकांनी काम केले नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. हे जाणून असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी आता यातून पुन्हा उभारी घेण्यासाठी व बिनकामी नगरसेवकांना शह देण्यासाठी नगरसेवकांच्याच वॉर्डमध्ये स्वयंसेवक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर नसेल ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये १ लाख २७ हजार १४३ मते पडली होती. त्यामध्ये सातारा शहराचा वाटाही चांगला होता. परंतु २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एकूण ९७ हजार ९६४ मते पडली. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना या निवडणुकीमध्ये अचानक मताधिक्क्य घटल्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंना मानणारा वर्ग कमी झाला की काय, अशीही चर्चा सुरू झाली. काही नगरसेवक आपली ठेकेदारी बळकट करण्याच्या प्रयत्नात कामाकडे दुर्लक्ष आणि नेत्यांजवळ पुढे-पुढे करतात. त्यामुळे साहजीकच नेत्यांकडे सर्वसामान्यांचा थेट संपर्क तुटला. त्यातूनही एखादा नागरिक थेट नेत्यांना भेटलाच तर संबंधित वॉर्डमधील नगरसेवकाच्या भुवया उंचवतात. अशा भेटींचा प्रतिष्ठेचा मुद्दा करून नगरसेवकांकडून सर्वसामान्यांची नेहमीच बोळवण केली जाते. त्यामुळे नाराज असलेले नागरिक मग मतपेटीद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात. हीच परिस्थिती सध्या सातारा शहरामध्ये असल्यामुळे नगरसेवकांना चेकमेट देण्यासाठीच ही व्यूहरचना असल्याचे बोलले जात आहे.