शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या फेरविचारासाठी मेढ्यात आज विशेष ग्रामसभा

By admin | Updated: August 25, 2014 22:52 IST

अजब तर्कशास्त्र : म्हणे अवैध मार्गाने दारू येतेच, तर दुकाने बंद का?

मेढा : दारूमुक्त तालुका असा लौकिक प्राप्त करूनही जावळी तालुक्यात अवैध मार्गाने दारू येतच आहे, तर मग वैध दुकाने का नकोत, असा अजब सवाल उपस्थित करून काहीजणांनी वैध दारू दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि. २६) विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली असून, दारूबंदीच्या समर्थकांचा त्याला तीव्र विरोध आहे.दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते आणि रणरागिणींच्या अथक प्रयत्नांतून पाच गावांतील १३ दारू दुकाने बंद करून जावळी तालुक्याने इतिहास रचला. त्यानंतर अवैधरीत्या दारू येत राहिली ती पोलीस, उत्पादनशुल्क विभाग आणि काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळे. दारूबंदीचा निर्णय मात्र ग्रामसभेत झालेला होता. आता अवैध दारूविक्री सुरू आहेच, तर वैध दुकाने का नकोत, असा सवाल उपस्थित करीत ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. कधी नव्हे ते ग्रामसभेची सूचना देणारे फ्लेक्स फलक झळकले आहेत. महिलांच्या मतदानाने झालेली दारूबंदी उठविण्यासाठी बोलावलेली ही विशेष ग्रामसभाच बेकायदेशीर असून, त्याविरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दारूबंदी महिला कमिटी आणि व्यसनमुक्त युवक संघाने म्हटले आहे. असे असले तरी ग्रामस्थ, महिलांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून दारूबंदीचा इतिहास कायम ठेवावा, असे आवाहनही संघाने केले आहे.नऊ डिसेंबर २००७ रोजी मेढा येथे महिलांचे मतदान होऊन मेढा गावातील दोन देशी दारू दुकाने, दोन बिअर बार, एक बिअर शॉपी, एक ताडी-माडी दुकान बंद करण्यात आले. यानंतर दारूविक्रेत्यांनी मुंबई येथे उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्तांकडून २० मार्च २००८ रोजी दारूबंदीला स्थगिती मिळविली. यानंतर मेढा येथील दारूदुकाने सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मेढा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शंखनाद आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्यासमवेत मेढ्यातील महिलांचे शिष्टमंडळ घेऊन व्यसनमुक्त संघाचे कार्यकर्ते उत्पादनशुल्क मंत्री गणेश नाईक यांना भेटले. परंतु त्यांनी आयुक्तांच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर सातारा येथील कार्यक्रमास येणाऱ्या शरद पवार यांना काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन महिलांनी जाहीर केले. या आंदोलनाचा धसका घेऊन ११ एप्रिल २००८ रोजी दारू दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाला गणेश नाईक यांनी स्थगिती दिली व मेढ्यातील दारूबंदी दुसऱ्यांदा यशस्वी झाली.‘पिचलेल्या महिला वारंवार आंदोलने करू शकत नाहीत. परंतु भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ग्रामस्थांनी व महिलांनी एकत्र येऊन नतद्रष्टांनी स्वार्थासाठी दारू दुकाने सुरू करण्याचा चालविलेला प्रयत्न हाणून पाडावा,’ असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाने केले आहे. (प्रतिनिधी)दारूबंदी होऊनही अवैध मार्गाने दारू येतच आहे, तर दारूबंदीचा फेरविचार करण्यासाठी विशेष ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनीच ग्रामसभेत केली होती. दारूबंदीला वर्ष झाल्यानंतर ती कायम ठेवायची नसेल, तर ग्रामसभाच घ्यावी लागते. त्यामुळे ही सभा बोलावण्यात आली आहे. दारूबंदी उठवायची की कायम राखायची हा निर्णय ग्रामस्थांनीच घ्यायचा आहे. दोन्ही पर्याय ग्रामस्थांसमोर खुले असतील. त्यातून त्यांनीच निवड करावी.- सुजीत जवळ, सरपंच, मेढा