शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

टॉप टेन, टॉप बॉटम गावावर पोलिसांचे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल सज्ज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यानिहाय बाधितांच्या संख्येनुसार टॉप टेन व टॉप बॉटम गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात विनापास फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये गंभीर आजारपण किंवा जवळच्या नातेवाइकाचा मृत्यू या कारणाव्यतिरिक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर दहा हजार दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी अधीक्षक बन्सल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे.

त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय कोरोना संसर्गाच्या बाधितांच्या संख्येनुसार टॉप टेन व टॉप बॉटम गावांची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. या गावांवर प्रभारी अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे. सरंपच व ग्रामसंरक्षण समितीच्या मार्फत या गावात विनाकारण फिरणारे, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जादा संख्या असलेल्या गावांमध्ये गृहविलगीकरणात असलेले बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कमी संख्या असलेल्या गावांतील बाधितांचा आकडा शून्यावर येण्यासाठी येथील निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. त्याबाबत अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.