शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

स्मृतिसदनाभोवतालचा बगीचा लवकरच बहरणार!

By admin | Updated: November 20, 2015 00:06 IST

बागेचे काम प्रगतिपथावर : बगीचा परिसरात ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत मासिक सभेत होणार निर्णय; निसर्ग, पर्यटन विकास योजनेतून निधी

कऱ्हाड : येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाभोवतालच्या बंद अवस्थेत असलेल्या बगीच्याच्या कामाला आता सरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत स्मृतिसदनाचा बगीचा बहरणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, स्मृतिसदन परिसरातील बागेचे काम मात्र १२ वर्षांपासून रखडलेले होते. आता रखडलेल्या बगीच्याच्या डागडुजीच्या कामास सुरुवात झाली असून, ते प्रगतिपथावर आहे. त्यामुळे शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.निसर्ग, पर्यटन विकास योजनेअंतर्गंत शहरातील स्मृतिसदनालगत असलेला बगीचा विकसित करण्याचा निर्णय कऱ्हाड पालिकेच्या वतीने घेण्यात आला. त्यातून निसर्ग पर्यटन विकासाच्या निधीमधून सुमारे ७७ लाखांची कामे प्रास्तावित करण्यात आली. या कामांमध्ये लॉन , विद्युतीकरण, खेळणी, संरक्षक भिंतीची रंगरंगोटी, आकर्षक झाडांची लागवड त्यास पाण्याची उत्तम व्यवस्था आदी कामांचा समावेश या प्रास्तावित कामांमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या बगीच्याच्या डागडुजीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.उद्यानाच्या कामास जानेवारी २००३ मध्ये प्रारंभ झाला. त्यानंतर काही दिवस काम सुरू राहिले. मात्र, अनेक वर्षांपासून काम बंद अवस्थेत होते. स्मृतिसदनाच्या नूतनीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या पाच कोटी निधीमुळे नूतनीकरणाच्या कामास सुरुवात झाली.आता नुकतेच स्मृतिसदनाभोवतालच्या उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या जेसीबी तसेच ट्रॅक्टरच्या साह्याने उद्यानातील माती काढण्याचे काम केले जात आहे. तसेच पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासह लॉनचीही डागडुजी केली जात आहे. यामध्ये उद्यानातील पूर्वीचे असलेले लॉन हे यंत्राद्वारे काढण्यात आले असून, त्या जागी नवीन लॉन तयार केले जात आहे. स्मृतिसदनाभोवताली पूर्ण उद्यान न करता काही भाग पार्किंगसाठी ठेवण्यात येणार आहे. स्मृतिसदनामध्ये अंतर्गत विद्युत रोषणाईबरोबर डिजिटल साऊंड सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे विजेचा जास्त प्रमाणात वापर होणार आहे. त्यासाठी स्मृतिसदन परिसरात विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्यात यावा, याविषयी कऱ्हाड पालिकेच्या मासिक सभेत अंतिम निर्णय होणार आहे. बगीच्यामध्ये आता मुलांना बागडता येणार असल्याने नागरिकांमधून सामाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)बारा वर्षे बंद होते नूतनीकरणाचे कामकऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनच्या नूतनीकरणाचे काम हे २००३ मध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाले. मात्र, २००३ पासून ते २०१५ पर्यंत बारा वर्षांत काहीच काम झाले नाही. मात्र, गेल्या वर्षभरापासूून खऱ्या अर्थाने स्मृतिसदनाच्या नूतनीकरणाच्या कामास वेग मिळाला.यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाला आकर्षक लूकनूतनीकरणानंतर यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाची इमारत आकर्षक दिसत आहे. या इमारतीत अंतर्गत भागासह बाहेरील भागातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाईची सुविधाही इमारतीत करण्यात आली आहे.कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आले. सध्या स्मृतिसदनाभोवताली बागेच्या डागडुजीचे काम सुरू असून, तेही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.- प्रशांत रोेडे, मुख्याधिकारी, नगरपालिका कऱ्हाड