शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दक्षिण, उत्तरेत राजकीय ‘मिसळ’

By admin | Updated: August 7, 2015 22:10 IST

कऱ्हाड तालुक्यात सत्तांतराचा गुलाल : गट-तट बाजूला ठेवून अनेक गावांत बेरजेचं राजकारण --ग्रामपंचायत विश्लेषण

प्रमोद सुकरे- कऱ्हाड -राजकीय समीकरणे सतत बदलत असणाऱ्या कऱ्हाड तालुक्यात नुकत्याच ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. नेत्यांप्रमाणेच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींसाठी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. त्यामुळे निकालानंतरही राजकीय मिसळीमुळे ही ग्रामपंचायत अमूक एका गटाची, असे सांगणे अवघड होऊन बसले आहे. तरीही दक्षिणेत भोसले-उंडाळकर गटाने सरशी घेतल्याचे दिसते; पण आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला मिळालेले यशही दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. तर उत्तरेतही आमदार पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील समर्थकांनी हातात हात घालत काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू; अथवा मित्र नसतो. त्याचा प्रत्यय तर कऱ्हाड तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा येऊ लागला आहे. म्हणून तर विधानसभेतील पराभवानंतर भोसले-उंडाळकर गट ‘मैत्रिपर्व’ असं गोंडस बारसं घालून एकत्र आला आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत या मैत्रिपर्वाला यश आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. त्यामुळे सहाजिकच अनेक गावांत मैत्रिपर्वाला यश मिळाले आहे. भोसले-उंडाळकरांचे मैत्रिपर्व सर्वच गावात पचले, असे म्हणता येत नाही. कालवडेत उंडाळकर गटाच्या धनाजी थोरातांनी स्वतंत्र निवडणूक लढवित सत्ता कायम ठेवली. तर त्यांच्या विरोधात डॉ. अतुल भोसले व मदनराव मोहिते समर्थक एकत्र आले होते. बेलवडेमध्ये उंडाळकर व मदनराव मोहिते समर्थकांनी डॉ. अतुल भोसले गटाचा पराभव केला. कोळेमध्ये पृथ्वीराज चव्हाण समर्थक व डॉ. अतुल भोसले समर्थकांनी एकत्रित येऊन उंडाळकरांच्या समर्थकांचा धुव्वा उडविल दस्तुरखुद्द तालुक्याची उपराजधानी असणाऱ्या उंडाळेत तर अ‍ॅड. राजाभाऊ पाटील व अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांमध्ये लढत झाली. त्यामुळे कुणाचे किती उमेदवार अन् कुणाची किती सरशी, हे सांगताना कसरतच करावी लागते. उत्तरेत तर आमदार बाळासाहेब पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी अनेक गावांत हातात हात घालून काम केले, त्यामुळे त्यांना चांगलेच यश मिळाले; पण माजी आमदार उंडाळकरांच्या जुन्या गटाला बरोबर घेऊन ‘स्वाभिमानी’च्या मनोज घोरपडेंनी अनेक ग्रामपंचायतींत झेंडा फडकविला आहे. तर अनेक गावांत चांगलाच शिरकाव केला आहे. पण, निवडणुका पाहिल्यावर या विकासाच्या मुद्द्यावर किती झाल्या, हा संशोधनाचाच भाग ठरेल.कालेत ‘दादा’गिरीला घरघरकाले गावावर भीमरावदादा पाटील यांचा गेले चार दशकांहून अधिक काळ चांगलाच दबदबा होता.गत निवडणुकीत मात्र डॉ. अजित देसाई व सहकाऱ्यांनी विजयाचा चौकार ठोकत भीमरावदादांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडले.गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी हे सर्व सावरण्याचे प्रयत्न केले खरे; पण त्यामध्ये त्यांना अपयश आले.यावर्षी डॉ. अजित देसाई, नाना पाटील, पांडुरंग पाटील आदींनी हातात हात घालून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कडवी झुंज दिली.यंदा जागा दुप्पट करत आठचा आकडा गाठला, विरोधकांचे तीन उमेदवार किरकोळ मतांनी पराभूत झाले. नाही तर यंदा कालेत सत्तांतरच पाहायला मिळाले असते.उंडाळेत कोण विजयी, कोण पराभूत ?उंडाळे येथे यंदा प्रथमच ग्रामंपचायतीची निवडणूक झाली म्हणायची. कारण यापूर्वी निवडणूक लागायची; पण बिनविरोधच व्हायची. यावर्षी मात्र जयसिंगराव पाटील व अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांच्या विरोधात अ‍ॅड. उदय पाटील यांच्या समर्थकांनीच पॅनेल उभं केलं.या पॅनेलमध्ये भाऊंच्या पॅनेलने सहा तर दादांच्या पॅनेलने तीन जागा मिळविल्या. काहीजण ‘ताटात काय अन् वाटीत काय,’ अशी सारवासारव करीत आहेत. असं असलं तरी सध्या उंडाळे ग्रामपंचायतीत कोण जिंकलं अन् कोण हरलं याची चर्चा तालुकाभर सुरू आहे.उंडाळेच्या निवडणुकीत माजी आमदार विलासराव पाटलांनीही मतदान केले खरे; पण ते नेमके कोणत्या पॅनेलला हे अजून गुलदस्त्यातच आहे. कऱ्हाड दक्षिणेत भोसले-उंडाळकर गटांनी अनेक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला. कृष्णा कारखान्यात हा भोसले-उंडाळकर एकत्र आले होते.ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले-उंडाळकर या मैत्रिपर्वाची सरशी झाल्याचे मानले जाते. अनेक गावांत या गटाने अपेक्षित नसताना मुसंडी मारली आहे. भविष्यातील अनेक राजकीय आडाखे पाहता यात उंडाळकरांची अन् भोसलेंची किती ताकद वाढली, हे पाहावे लागणार आहे.