शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात घुमतोय ‘टोकड्या’चा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

पेट्री : कास, बामणोली, तापोळा म्हणजे सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा, दाट जंगलाचा विस्तीर्ण परिसर. येथील शेतकऱ्यांना वन्य पशुपक्ष्यांच्या उपद्रवाला ...

पेट्री : कास, बामणोली, तापोळा म्हणजे सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा, दाट जंगलाचा विस्तीर्ण परिसर. येथील शेतकऱ्यांना वन्य पशुपक्ष्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागते. यासाठी घरगुती वापरातील तसेच सहज वस्तू उपलब्ध होतील असे एक उपकरण तयर केले आहे. काचेच्या बाटलीला खिळा बांधलेला असतो. वाऱ्यामुळे तो हलतो अन् आवाज येतो. त्यामुळे पशुपक्षी त्या दिशेला येत नाहीत. त्याला ‘ठोकडा’ असे म्हटले जाते.

या परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने येथील परिसरात खरीप पिके चांगल्याप्रकारे घेतली जातात. तसेच काही ठिकाणी रब्बी पिकेही घेतली जातात. सद्य स्थितीत गहू, ज्वारी, हरभरा, पावटा यासारखी पिके शिवारात आली आहेत. कष्टाने पिकवलेल्या उभ्या पिकाची पाखरे आणि वन्यजिवांपासून राखण करताना या परिसरातील बळीराजाला मोठया प्रमाणावर कसरत करावी लागते. यासाठी घरगुती वापरातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून कोणताही खर्च न करता ‘ठोकडा’ या उपकरणाद्वारे ‘टणटण’ आवाज येऊन दिवस-रात्र शिवारातील पिकांची राखण केली जात आहे.

दरम्यान, रानडुक्कर, रानगवे, साळिंदर, लाडोंर, रान कोंबडया, ससे यांचा प्रामुख्याने रात्रीच्यावेळी, तर माकडे, वानरे, पाखरे दिवसभर पिकांची नासधुस करतात. या वन्य पशु-पक्ष्यांपासून पिके वाचविता यावीत तसेच त्यांना संरक्षण देऊन होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी परिसरातील शेतकरी वर्ग ठोकडा या साध्या पीक संरक्षणाच्या उपकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. रानात मोठी काठी रोऊन तसेच मचान किंवा झाडाच्या फांदीला त्याच्या उंचावरील टोकाला स्टील अथवा पत्र्याचा मोकळा डबा तसेच काचेची बाटली अडकवली जाते. अगदी टाकाऊ अशा तेलाच्या डब्याचा किंवा काचेच्या बाटलीचाही वापर केला जातो. अडकवलेल्या डब्याच्या किंवा बाटलीच्या खालोखाल जड पुठ्ठा किंवा धान्याचे रिकामे पोते तसेच सुपासारखी अथवा अन्य कोणतीही जड वस्तू अडकवली जाते. डब्याच्या चोहो बाजूला वरील बाजूस गोलाकार रिंग तयार करून आठ-दहा लाकडी तसेच लोखंडी सळया खाली टांगत्याप्रकारे मोकळी सोडली जातात. डब्याखाली किंवा काचेच्या बाटलीखाली लटकलेली जड वस्तू हलल्यानंतर डब्याच्या किंवा काचेच्या बाटलीच्या चोहोबाजूच्या लाकडी अथवा लोखंडी सळई डब्यावर आपटून होणाऱ्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातात व पिकांचे रक्षण केले जाते.

चौकट

या उपकरणावर वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. हवेची थोडीशी झुळूक आली, तरी टणटण आवाज होतो. हा आवाज शिवारात संपूर्णतः येत असल्याने आवाजाच्या भीतीने राखणीला मनुष्य नसतानादेखील वन्यपशुपक्षी शिवाराकडे न फिरकता परिणामी पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होते.

फोटो

०५पेट्री-ठोकडा

कास, बामणोली, तापोळा परिसरात पिकांचे जनावरांपासून रक्षण करण्यासाठी या प्रकारचे ‘ठोकडा’ हे उपकरण शेतकरी करत आहेत. (छाया : सागर चव्हाण)