शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

बावधनमध्ये घुमला ‘चांगभलं’चा गजर

By admin | Updated: March 17, 2017 23:28 IST

बगाड यात्रा उत्साहात : देशभरातील लाखो भाविकांची हजेरी; उत्सवाला तीनशे वर्षांची परंपरा

कवठे/पसरणी : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बावधनच्या (ता. वाई) काळभैरवनाथाची बगाड यात्रा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. बावधन बगाड यात्रा ही महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी भव्य यात्रा आहे. या यात्रेसाठी राज्यासह देशभरातील भाविक बावधन येथे दाखल झाले होते. होळी पौर्णिमेला भैरवनाथ मंदिरात कौल लावून यंदाचा बगाड घेण्याचा मान युवराज ठोंबरे यांना मिळाला.ओझर्डे येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या सोनेश्वर या ठिकाणापासून बगाड यात्रेस प्रारंभ झाला. भरभक्कम व पूर्णत: लाकडी असलेला हा बगाड रथ सहा बैलजोड्यांच्या साह्याने ओढण्यात आला. ‘काशिनाथाचं चांगभलं’चा गजर झाल्याबरोबर एकावेळी हे सर्व बैल आपल्या ताकदीनिशी गाडा ओढत होते. ठराविक अंतरावर बैल बदलून नव्या दमाच्या बैलांच्या साह्याने सायंकाळी ६.३० च्या दरम्यान बगाडाने बावधन गावात प्रवेश केला.सर्व स्थानिक ग्रामस्थ पांढऱ्या पोशाखात होते. बगाड गावात पोहोचताच बगाडाचे रिंगण पूर्ण करून बगाड्यास खाली उतरवून देवाचा प्रसाद दिला गेला व बगाड यात्रेची सांगता करण्यातआली. (वार्ताहर)रथाला दोन दगडी चाके; ४० फुटांचे शीडसुमारे तीनशे वर्षांपासून बगाड प्रथा सुरू आहे. गावातील थोरल्या विहिरीत पाण्याखाली असलेले बगाड साहित्य बाहेर काढून त्यापासून बगाड गाडा तयार केला जातो. या रथाची दोन दगडी चाके १० फूट लांब लाकडी कण्याने जोडली जातात. यावर लाकडी वाघल्या वसवून त्यावर मधोमध १८ फूट उंच कण्यास ४० फूट लांबीच्या कळकाचे शीड बांधले जाते व त्यास अग्रभागी बगाड्यास टांगले जाते.रथ ओढणाऱ्या बैलांवर लाखोंचा खर्चबगाड यात्रेत शेतकरी वर्गाचे लक्ष पूर्णत: बैलांवर असते. कोणाच्या बैलाने किती चांगल्या पद्धतीने रथ ओढला याची चर्चा महिनाभर परिसरात असते. आपल्या बैलामुळे आपले नाव चर्चेत यावे यासाठी लाखाच्या आसपास किंमत असलेले खिलारी बैल खास बगाडासाठी जतन केले जातात. पोटच्या पोरासारखे बैलांना दोन महिने आधीपासून खुराक, रतीब देऊन रथ ओढण्याऱ्या लाकडी ओंडक्यास जुंपून बैलांचा महिनाभर सराव घेतला जातो.पार्किंग व्यवस्था व भाविकांसाठी पाणीपुरवठाबावधन येथे मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे पार्किंग तळ तयार करण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यास पोलिसांना यश आले. बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरून त्यावरून सूचना देण्यात येत होत्या. पाणीपुरवठा करण्यासाठी जागोजागी वाहने असल्याने यात्रेकरूंची तृष्णा भागविली जात होती.