शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाटण दूध संघामार्फत मुरघास प्रकल्प उभारणार : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

सोनगाव (ता. पाटण) येथील पाटण तालुका दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नियमांचे पालन करून पार पडली. त्याप्रसंगी ते ...

सोनगाव (ता. पाटण) येथील पाटण तालुका दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नियमांचे पालन करून पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, उपाध्यक्ष शांताराम सूर्यवंशी, संचालक आबासाहेब शिंदे, विठ्ठल लांबोर, रघुनाथ दंडीले, अशोकराव मोरे, विकास शिलवंत, आकाताई काळे, आप्पासाहेब मोळावडे, सुंदर पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शंकरराव जाधव म्हणाले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक संघ यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. संघाने सन २०१९-२० मध्ये ५३ लाख ३६ हजार ३९३ लिटर एकूण दूध संकलन केले आहे. संघाला निव्वळ नफा चार लाख इतका झाला आहे. दूध संस्थांना व दूध उत्पादकांना प्रति लिटर १.२५ रुपये दूध दर फरकाची तरतूद केली असून, सेवकांना बोनस ३० टक्क्यांप्रमाणे १२ लाख ५६ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. संघाला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना संघास दूध पुरवठा केलेल्या दुधावर प्रतिलिटर १० पैसे प्रमाणे ऑडिट फी रक्कम रुपये २.२१ लाखांची तरतूद केली आहे. दूध संस्थांच्या सचिवांसाठी एक पगाराएवढा बोनसही दिला जाणार आहे. दूध संस्थांना मिल्कोटेस्टर कॉम्प्युटर, कडबाकुट्टी मशीन आदींसाठी १ लाख ७५ हजारांचे अनुदान वाटप केले आहे.

व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी अहवाल वाचन केले. संघाचे संचालक सुभाषराव पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संचालक अशोकराव मोरे यांनी आभार मानले. (वा.प्र.)

फोटो : ०८केआरडी०१

कॅप्शन : सोनगाव (ता. पाटण) येथे दूध संघाच्या वार्षिक सभेत अध्यक्ष शंकरराव जाधव यांचे भाषण झाले.