पुसेगाव : शिक्षकांचे तसेच संस्थांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, अशी ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुसेगाव या संस्थेच्या विविध शाखांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष विश्वनाथराव जाधव होते.
काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनपूर्वक काम व प्रचार केल्याने सर्व सूज्ञ मतदारांनी मतदान करून मा. जयंत आसगावकर यांना विजयी केले. डॉ . संजय शिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व संस्था विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, योगेशराव देशमुख, मानाजीराव घाडगे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे, प्रा. अच्युतराव माने, डॉ. संजय क्षीरसागर, प्राचार्य डी. बी. काळे, पर्यवेक्षक एस. व्ही. माने आदी उपस्थित होते. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. एम. एस. चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो : ०९ पुसेगाव शिक्षक
पुसेगाव येथील कार्यक्रमात आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विश्वनाथराव जाधव, डॉ. सुरेश जाधव, मोहनराव जाधव-पाटील आदी उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)