शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे ढीग जप्त करता मातीही मिळे..! Vजावळी तालुक्यात दुर्लक्ष : महसूल विभागाची तत्काळ कारवाई; लिलावास मात्र विलंब, आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:12 IST

सायगाव : जावळी तालुक्यातील कारवाईतील वाळू जप्त करून पोलिसांकडे देखरेखीसाठी स्वाधीन केली जाते.

ठळक मुद्देचोरटी वाळू वाहतूक होऊन किमान आवश्यक कामासाठी वाळू उपलब्ध करण्याचा प्रयत्न बांधकाम

सायगाव : जावळी तालुक्यातील कारवाईतील वाळू जप्त करून पोलिसांकडे देखरेखीसाठी स्वाधीन केली जाते. अशी कारवाईची वाळू अनेक महिन्यांपासून पोलिस स्टेशनच्या आवारात पडून राहिल्यामुळे तिची अक्षरश: माती झाली आहे. लिलावासाठी जिल्हा महसूल प्रशासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेतही वाळू असून, तिचा तत्काळलिलाव व्हावा, अशी मागणी होत आहे.जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी अवैध वाळूवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या आदेशान्वये वाळू उपसा बंद असून, चोरट्या वाळूवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना महसूलला देण्यात आलेल्याआहेत. त्यामुळे वाळूसम्राटाचे धाबे दणाणले असून, वाळूला अगदी सोन्याचा भाव आला आहे. कारवायांमुळे वाळूचा तुटवडा निर्माण होऊन खासगी तसेच शासकीय बांधकामे रखडली आहेत. त्यातूनही रात्रीच्या दरम्यान, चोरटी वाळू वाहतूक होऊन किमान आवश्यक कामासाठी वाळू उपलब्ध करण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून होताना दिसत आहे.

अशी चोरटी वाहतूक महसूल विभागाच्या निदर्शनास आली की तत्काळ कारवाई केली जात आहे. जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी जवळपास २५ पेक्षा अधिक ब्रास वाळू कारवाईत जप्त केली आहे. ही वाळू मेढा पोलिसांच्या ताब्यात देखरेखीसाठी देण्यात आली आहे.त्यामुळे पोलिस स्टेशनच्या आवारात वाळूचे ढिगारे दिसत आहेत. गेले कित्येक महिने ही वाळू पडून असल्यामुळे तिची अक्षरश: ‘माती’ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तत्काळ लिलाव करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या आवारातील वाळूच्या ढिगाºयामुळे सर्वांनाच त्रास होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.श्तालुक्यातील शासकीय कामे रखडली...महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेली वाळू कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासकीय कामे घेणाºया ठेकेदारांना लिलाव पद्धतीने ती द्यावी, असा नियम आहे. मात्र, महसूल विभाग केवळ कारवाईवर धडाका लावून लिलावकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. वाळूअभावी तालुक्यातील शासकीय कामे रखडली असून, मार्चअखेर कामे पूर्ण न केल्यास बिले कशी निघणार? या विचारात ठेकेदार आहेत. त्यामुळे महसूल विभागाने तत्काळ लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे. 

ढिगाºयांमुळे कामकाजात अडसर...सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी स्वच्छ सुंदर पोलिस स्टेशन करण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये हे जप्त केलेले वाळूचे ढिगारे कामकाज करताना अडसर ठरत आहेत. सध्या तर केवळ या वाळूची रखवालदारी पोलिसांना करावी लागत आहे.मेढा पोलिस स्टेशनच्या आवारात अनेक महिन्यांपासून जप्त करुन ठेवलेल्या वाळूची माती होऊ लागली आहे.