शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दूर सणासाठी मातीचे बैलं सज्ज, खटावमधील कुंभारवाड्यातील चित्र

By admin | Updated: June 10, 2017 13:59 IST

काम अंतिम टप्प्यात; महिला पुरुषांसह लहान मुले कामात व्यस्त

आॅनलाईन लोकमतखटाव (सातारा), दि. १0 : बैलपोळ्याचा सण अर्थात बेंदूर जवळ आल्यामुळे ग्रामीण भागातील कुंभारवाड्यात मातीचे बैलं तयार करण्याची लगबग तसेच बैलं तयार करण्याची काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. बेंदूर सणाला शेतकऱ्यांबरोबरच सर्वांनाच फार महत्त्वाचे स्थान आहे. बेंदूर हा सण आता जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे कुंभारवाड्यात बैलं तयार करण्याच्या कामास आता वेग आला आहे. मातीच्या बैलांबरोबरच गेल्या दोन-तीन वर्षांपासून मातीचे नावीन्यपूर्ण आकर्षक रंगीत बैलं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. हौशी ग्राहक रंगकाम केलेले बैलं जादा किंमत देऊन ते विकत घेत असल्यामुळे तेही बनवण्याचे काम सुरू आहे. कुंभारवाड्यात आता महिला, पुरुष मंडळींसह लहान मुलेही बैलं तयार करण्याच्या कामात हातभार लावताना दिसून येत आहेत.

ग्रामीण भागात आजही बैते पद्धत असल्यामुळे बेंदूर सणाच्या एक दिवस आधी गावातील कुभार परंपरेने ठरवून घेतलेल्या कुटुंबांना पूजन करण्यासाठी मातीचे बैलं देऊन त्या बदल्यात पैसे अथवा धान्य घेत असतात. त्याचबरोबर याच सणाच्या दिवशी गावातील मातंग समाजातील कुटुंबाकडून आंब्याच्या पानाचे तोरण तयार करून ते घराला बांधण्याची परंपराही आजही ग्रामीण भागात सुरू आहे. या तोरण बांधणाऱ्या लोकांना त्या बदल्यात पुरपोळ्या तसेच धान्य देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गावोगावी मातंग समाजात बेंदूर सणासाठी तोरण तयार करण्याचेही काम सुरू आहे. आपल्या ढवळ्यापोवळ्याची पूजा करण्यासाठीची बळीराजाही आतुरतेने या दिवसाची वाट पाहाताना दिसून येत आहे.