शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूरकरांमुळे सामाजिक कार्यास बळकटी

By admin | Updated: July 31, 2015 01:05 IST

राणी बंग : विविध संस्थांच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान

रहिमतपूर : सामाजिक काम करताना लोकांचा आशीर्वाद, प्रेम पाठीशी असावे लागते. आपण सर्व शैक्षणिक संस्था एकत्र येऊन माझा व माझ्या सहकार्यांचा सन्मान, बहुमान केला. हा सन्मान गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, गैर आदिवासी लोकांचाही आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मी भारावून गेले आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत डॉ. राणी बंग यांनी रहिमतपूरवासीयांनी जो आमच्यावर विश्वास दाखविला आहे. त्याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही. आपल्या आशीर्वादामुळे व प्रेमामुळे सामाजिक कार्यास अधिक बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे पंचक्रोशी शिक्षण मंडळ, आदर्श शिक्षण संस्था, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, चौंडेश्वरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुला-मुलींसाठी तारुण्यभान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विविध संस्थाच्या वतीने त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी चित्रलेखा माने-कदम, सुनील माने, नंदकुमार माने-पाटील, प्रेमलता माने, अरुण माने, एस. के. माने, वि. वा. साळवेकर, आशा भोसले यासह विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ. बंग म्हणाल्या, ‘आपल्या समाजात नानाविध प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक कार्याला पाठबळाची व प्रोत्साहानाची गरज असते. यातूनच सशक्त समाजाची निर्मिती होत असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा जिल्हा व गडचिरोली जिल्हा यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. रहिमतपूर जसं आपलं घर आहे, तसं गडचिरोलीही आपलं घर आहे. या घरात, परिवारात आपलं नेहमीच स्वागत होईल,’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले . कार्यक्रमासाठी प्राचार्य बी. व्ही. निकम, श्रीकृष्ण गोसावी, पी. पी. माने, जे. एन. माने, मुख्याध्यापक डी. व्ही. जगताप, पी. पी. वावरे, कार्यशाळा समन्वयक अच्युत माने, अजित कदम, विविध संस्थाचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, शिक्षक, पालक, शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थिंनी उपस्थित होते. प्रा. सुनंदा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य पी.पी. माने यांनी आभार मानले. (वार्ताहर)