शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण आयुक्त घाटे निलंबित

By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST

सोलापुरातील शिष्यवृत्ती घोटाळा : गुन्हा दाखल झाल्याने रजेवर

सांगली : सोलापूर येथील समाजकल्याण विभागातील दोन कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याला जबाबदार धरून राज्य शासनाने शुक्रवारी तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे यांना निलंबित केले. घाटे सध्या सांगली येथे सहायक समाजकल्याण आयुक्त आहेत. घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ते सध्या वैद्यकीय रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. दहावी उत्तीर्ण मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. समाजकल्याण विभागामार्फत वितरित होते. घाटे सोलापूर येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असताना तेथे दोन कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी सोलापूर पोलीस ठाण्यात घाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह अनधिकृतपणे सांगली जिल्ह्याकडे हस्तांतरित केल्याचे उघड झाले आहे. अधिकाराचा गैरवापर आणि आर्थिक घोटाळ्यास जबाबदार धरून घाटे यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त (आस्थापना) लक्ष्मीकांत महाजन यांनी दिली. सोलापूर येथील शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा चव्हाट्यावर आल्यामुळे घाटे यांच्या कार्यकालातील सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येणार आहे. सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यातीलही त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने खास अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) सांगलीतील भरतीमध्येही गोलमाल समाजकल्याण विभागाच्या सांगली येथील कार्यालयाचा पदभार घेतल्यानंतर घाटे यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून भरती प्रक्रिया झाल्याच्या तक्रारी आहेत. शिपायास शिष्यवृत्ती वाटपासारख्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी देणे, कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देणे यासह अनेक तक्रारी घाटे यांच्याविरोधात राज्य शासनाकडे गेल्या आहेत. या सर्व प्रकरणांचीही स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत शासनाने चौकशी सुरू केली आहे.